या असल्या बाईला आई म्हणायचं? चार वर्षाच्या मुलीला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले; या मागचे कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल

या घटनेचा पूर्ण व्हिडीओ अपार्टमेंटमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला आहे. सुषमा असे या कुमातेचे नाव आहे. ही महिला बाल्कनीत काही काळ तिच्या मुलीसोबत खेळत होती. दुपारी ३ वा. ५ मिनिटांच्या सुमाराला ही महिला काही काळ चालली. त्यानंतर मुलीला बाल्कनीतून खाली फेकून दिले. त्यानंतर आत्महत्या करण्यासाठी ती स्वताही बाल्कनीच्या रेलिंगवर चढली. रेलिंगवर चढल्यावर ती काही काळ थांबली. त्याचवेळी कुटुंबीय धावत आले आणि त्यांनी तिला खाली उतरवून वाचवले.

या असल्या बाईला आई म्हणायचं? चार वर्षाच्या मुलीला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले; या मागचे कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल
वनिता कांबळे

|

Aug 05, 2022 | 7:38 PM

बंगळुरु :  एका महिलेने आपल्या चार वर्षांच्या लहानगीला चौथ्या मजल्याच्या बाल्कनीतून फेकून दिल्याची घटना बंगळुरात(Bangalore) घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात लहानग्या मुलीला तिची आी चौथ्या मजल्यावरुन खाली फेकताना दिसते आहे. मुलीला फेकल्यानंतर ही महिलाही कठड्याच्या रेलिंगवर उभी राहिली, आणि त्याच अवस्थेत ती काही काळ थांबलीही. घरातील कुटुंबीय धावत गॅलरीत पोहचले आणि त्यांनी या महिलेला खेचून रोलिंगवरुन खाली उतवले. या लहानगीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महिलेचाही आत्महत्येचा प्रयत्न

या घटनेचा पूर्ण व्हिडीओ अपार्टमेंटमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला आहे. सुषमा असे या कुमातेचे नाव आहे. ही महिला बाल्कनीत काही काळ तिच्या मुलीसोबत खेळत होती. दुपारी ३ वा. ५ मिनिटांच्या सुमाराला ही महिला काही काळ चालली. त्यानंतर मुलीला बाल्कनीतून खाली फेकून दिले. त्यानंतर आत्महत्या करण्यासाठी ती स्वताही बाल्कनीच्या रेलिंगवर चढली. रेलिंगवर चढल्यावर ती काही काळ थांबली. त्याचवेळी कुटुंबीय धावत आले आणि त्यांनी तिला खाली उतरवून वाचवले.

आईला मुलीपासून सोडवणूक हवी होती-पोलीस

ही घटना बंगळुरुच्या एसआर नगरमध्ये घडली. ही महिला आपल्या मुलीपासून सोडवणूक करुन घेण्याच्या प्रयत्नात होती. यापूर्वीही तिने या लहानगीला रेल्वे स्टेशनवर सोडून देण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेचा पती किरणला याची माहिती मिळाल्यानंतर त्याने रेल्वे स्टेशनवर जाऊन त्याने या मुलीला वाचवले होते. हे कुटुंब सीकेसी गार्डन परिसरात आदिवेथ आश्रय अपार्टमेंट येथे राहत होते.

मुलगी मूकबधीर होती, त्यामुळे निर्घुण कृत्य

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या लहानगीचे नाव धृती असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही लहान मुलगी मूकबधीर होती. तिला बोलता आणि ऐकता येत नव्हते. यामुळे तिची आईच तिच्यावर नाराज होती. या प्रकरणात मुलीला खाली फेकल्यानंतर पतीने या पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर या तक्रारीवरुन पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला डेंटिस्ट आहे, तर तिचा पती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या महिलेच्या मानसिक अवस्थेसह इतरही कारणांचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें