AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं एक गाव जिथे भरतो सुंदर तरुणींचा बाजार, विवाह इच्छुक तरुण लग्नासाठी करतात खरेदी, किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की असं देखील एक गाव आहे, जिथे लग्नासाठी चक्क मुलींची विक्री होते. विवाह इच्छुक मुलींचा बाजार भरतो. ज्या तरुणांची लग्न होत नाहीत, किंवा ज्यांना लग्न करायचं आहे, असे तरुण या गावात गर्दी करतात.

असं एक गाव जिथे भरतो सुंदर तरुणींचा बाजार, विवाह इच्छुक तरुण लग्नासाठी करतात खरेदी, किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 23, 2026 | 3:25 PM
Share

प्रत्येक देशाच्या, प्रदेशाच्या आणि गावाच्या आपल्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा असतात, या प्रथा कधी-कधी जाती आधारीतही असतात तर कधी-कधी एखाद्या विशिष्ट समाजाशी संबंधित असतात. जाती आधारीत म्हणजे या प्रथांचं पालन केवळ त्या विशिष्ट जातींमध्येच केलं जातं, अशा अनेक प्रथा परंपरा आजही आहेत. यातील काही प्रथा या वेगळ्या असल्यामुळे चर्चेत येतात. आजही जगातील असे अनेक देश आहेत, जिथे लग्नासाठी महिलांची बोली लागते. एखाद्या बाजारात गेल्यानंतर आपण जशी भाजी विकत घेतो, तशी लोक पत्नी म्हणून या महिलांची खरेदी करतात त्या बदल्यात त्या कुटुंबाला पैसे दिले जातात. जिथे गरीबी आहे, अशा ठिकाणी ही प्रथा मोठ्या प्रमाणात दिसून येते. अगदी भारताचं जरी उदाहरण द्यायचं झालं तरी आज देखील मध्य प्रदेशमध्ये अशीच एक प्रथा पहायला मिळते, मध्य प्रदेशमधील शिवपुरीत देखील असाच एक बाजार भरतो.

समोर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी या महिलांच्या कुटुंबाच्या संमतीने महिलांची लग्नासाठी विक्री होते. त्यासाठी अधिकृत स्टॅम्प देखील बनवला जातो. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की या स्टॅम्पची किंमत दहा रुपयांपासून सुरू होते, तर महिलांची विक्री किंमत ही 15 हजार रुपयांपासून सुरू होते. परंतु आज आम्ही तुम्हाला ज्या गावाबद्दल माहिती सांगणार आहोत, ते गाव भारतामधील नाहीये. हे गाव आहे, बल्गेरियामधील स्टारा जागोर. या गावात दर तीन वर्षांनी विवाह इच्छुक स्त्रियांचा बाजार भरतो. अर्थात यामध्ये मुलीचे नातेवाईक तसेच मुलांचे नातेवाईक देखील सहभागी झालेले असतात.

या बाजारात सहभागी झालेला विवाह इच्छुक तरुण लग्नासाठी आपल्या पसंतीच्या मुलीची निवड करून तिला तिच्या कुटुंबाकडून खरेदी करतात. नंतर ते तिच्यासोबत लग्न करतात. या मागाचं महत्त्वाचं कारण म्हणजे या गावात राहणारे लोक हे खूप गरीब आहेत. त्यांच्याकडे मुलींच्या लग्नासाठी पैसे नसतात, त्यामुळे तिथे अशा पद्धतीने बाजार भरवला जातो, मात्र आता ही प्रथाच सुरू झाली आहे. या बाजारामध्ये जी विवाह इच्छुक तरुणी असते तिला नवरीच्या पोषाखामध्ये उभं केलं जातं. या बाजारात विवाह इच्छुक तरुण मोठी गर्दी करतात, जर त्यांना तिथे एखादी मुलगी आवडली तर त्या मुलीसोबत बोलण्यासाठी या तरुणाला वेळ दिला जातो. जर तरुणाला मुलगी पसंत असेल तर दोन्ही कुटुंबाच्या वतीनं त्यांचं लग्न केलं जातं. मुलाच्या कुटुंबाला या बदल्यात जी किंमत ठरेल तेवढे पैसे तरुणीच्या घरच्यांना द्यावे लागतात. इथे मुलीची किंमत तिचं कुटुंब ठरवतं, या संदर्भातील एक व्हिडीओ देखील अलीकडेच चांगलाच व्हायरल झाला आहे.

मात्र या ठिकाणी नियमांचं अगदी काटेकोरपणे पालन केलं जातं, ही प्रथा बल्गेरियामधील कलाइदझी समाजात आहे. या मेळाव्याचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे हा मेळावा दर तीन वर्षांनी भरतो, आणि जो मुलगा कलाइदझी समाजातील आहे, असाच मुलगा या मेळाव्यात सहभागी होऊ शकतो, इतर कोणालाही या मेळाव्यात सहभागी होता येत नाही.

Follow Us
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट..
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट...