AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं एक गाव जिथे महिलांसोबत करता येत 15 दिवसांसाठी लग्न, घटस्फोट, पोटगीची झंझट नाही, वर्षभरात कितीही लग्न करा

जर तुम्हाला असं कोणी सांगितलं की वर्षभरात तुम्ही कितीही लग्न करू शकता, तिथे तुम्हाला घटस्फोट घेण्याची किंवा पोटगी देण्याची देखील गरज नाही. तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खर आहे. अशा लग्नाचा कालावधी 15 दिवस ते महिनाभर असतो.

असं एक गाव जिथे महिलांसोबत करता येत 15 दिवसांसाठी लग्न, घटस्फोट, पोटगीची झंझट नाही, वर्षभरात कितीही लग्न करा
marriageImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 06, 2026 | 8:22 PM
Share

प्रत्येक देशाच्या, राज्याच्या, गावाच्या प्रथा परंपरा या वेगळ्या असतात. या प्रथा परंपरा म्हणजे त्या गावाची ओळख असते. तेथील लोक या प्रथा परंपरा जपत आलेले असतात. आपण जर या प्रथा परंपरांचा बारकाईने अभ्यास केला तर या प्रत्येक प्रथा परंपरांमागे आपल्याला काही विशिष्ट कारणे दिसून येतात. काही प्रथा तर या केवळ आर्थिक व्यवहारातून सुरू झाल्याचंही दिसून येतं. भारतीय संस्कृतीमध्ये लग्न हा पवित्र विधी मानला जातो. जेव्हा एक महिला आणि पुरुषाचं लग्न होतं, तेव्हा ते आयुष्यभर एकत्र राहतात. सुख, दु:खात ऐकमेकांची साथ देतात. काही अपवादा‍त्मक परिस्थितीमध्ये घटस्फोट देखील होतात. सध्या भारतामध्ये देखील घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. मात्र त्या घटस्फोटांना एक कायदेशीर आधार असतो. घटस्फोट झाल्यानंतर देखील जर पत्नी कमावत नसेल तर तिला पतीकडून पोटगी मिळते.

मात्र जगाच्या पाठीवर असा एक देश आहे, जिथे तुम्ही महिलांसोबत एका वर्षात तुम्हाला हवे तेवढ्यावेळेस लग्न करू शकता. इथे तुम्हाला घटस्फोट घेण्याचीही गरज पडत नाही आणि या महिलेला पोटगी देखील देण्याची गरज नसते. हा एक प्रकारे करार विवाह असतो. ज्यामध्ये तुम्ही तुम्हाला जी महिला किंवा तरुणी आवडते, तिच्यासोबत तुम्ही पंधरा दिवसांसाठी किंवा महिनाभरासाठी लग्न करू शकता. तुम्हाला वाटेल तितक्या दिवस तिच्यासोबत राहू शकता. मात्र त्याबदल्यात या महिलेला तुम्हाला काही पैसे द्यावे लागतात.

या देशाचं नाव आहे, इंडोनेशिया. मिडिया रिपोर्टनुसार इंडोनेशियामध्ये असे काही गावं आहेत, जिथे तुम्ही तुमच्या पसंतीच्या महिलेसोबत 15 दिवस किंवा एक महिन्यासाठी लग्न करू शकता. या प्रथेला ‘प्लेजर मॅरेज’ किंवा स्थानिक भाषेत ‘निकाह मुताह’ देखील म्हणतात. मिडिया रिपोर्टनुसार इंडोनेशियामध्ये अनेक गरीब कुटुंब आहेत, अशा कुटुंबातील महिला आपला घर खर्च चालवण्यासाठी अशा प्रकारे लग्न करतात. इंडोनेशियामध्ये पर्यटनासाठी आलेले पर्यटक या महिलांसोबत लग्न करतात. त्यानंतर हे पर्यटक 15 दिवस किंवा महिनाभरासाठी त्याच घरात राहतात. जेव्हा हे पर्यटक देश सोडतात, तेव्हा हे लग्न देखील आपोआप संपुष्टात येतं. याबदल्यात त्या महिलेला पैसे दिले जातात, एका लग्नासाठी या महिलांना 300 ते 500 डॉलर एवढे पैसे मिळतात.

Follow Us
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त