दक्षिणेत भाजपसाठी धोक्याची घंटा? दीपकेसारखीच अण्णामलाईंची क्रेझ वाढली, अचानक इतक्या लाखाच्यावर समर्थक, भाजप सोडणाऱ्यांचीही रीघच लागली…

Tamilnadu BJP leader Resign: उत्तरेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. कॉकरोच जनता पार्टीने आज आंदोलनाची हाक दिली आहे. तर दक्षिणतेही भाजपची डोकेदुखी वाढली आहे. अण्णामलाईंची क्रेझ वाढली आहे. दिवसागणिक त्यांचे समर्थक वाढत आहेत. तर भाजपमध्ये राजीनामा देण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.

दक्षिणेत भाजपसाठी धोक्याची घंटा? दीपकेसारखीच अण्णामलाईंची क्रेझ वाढली, अचानक इतक्या लाखाच्यावर समर्थक, भाजप सोडणाऱ्यांचीही रीघच लागली...
के. अण्णामलाई वी द लीडर्स
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 06, 2026 | 10:44 AM

Annamalai’s We The Leaders: उत्तर भारतात आज कॉकरोच जनता पार्टी या चळवळीने आंदोलनाची हाक दिलेली आहे. अभिजीत दीपके हा मराठमोळा तरूण या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. तर दक्षिणतेही भाजपची डोकेदुखी वाढली आहे. तामिळनाडूत भाजपमध्ये एका पाठोपाठ एक राजीनामा सत्र सुरू झाले आहे. राजीनामा देण्याची नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. नेतेच नाही तर कार्यकर्ते, पदाधिकारी हे सुद्धा पक्षाला रामराम ठोकत आहेत. अण्णामलाई यांच्या निर्णयाला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या समर्थकात दिवसागणिक वाढ होत आहे. दक्षिणेत भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

15 जणांचा भाजपला रामराम

भारतीय जनता पार्टीचे (BJP) माजी अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये राजीनामा देण्याची लाट आली आहे. शुक्रवारी 5 जून, 2026 रोजी पक्षाला जोरदार झटका बसला. अण्णामलाई यांच्या राजीनाम्यानंतर तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष कारू नागराजन आणि राज्य सचिव सुमती व्यंकटेश यांनी पक्षाला रामराम ठोकला. तर टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तामिळनाडू भाजपा उपाध्यक्ष कारू नागराजन आणि सचिव सुमती व्यंकटेश यांच्यासह पक्षाच्या 14 इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. हा भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे. पक्षाची मुख्य फळीच दुरावल्याने पक्षासमोर संकट उभं ठाकल्याचं मानल्या जात आहे.

भाजपकडे पाठ, अण्णामलाईची साथ

कारू नागराजन यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्याचवेळी त्यांनी माजी आयपीएस अधिकारी अण्णामलाई यांच्या राजकीय पक्षात जाण्याची आणि त्यांना साथ देण्याची भूमिका जाहीर केली. अण्णामलाई हे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्याच नाहीतर कुणाच्याही चुका मांडण्यास घाबरत नाहीत. के. अण्णामलाई हे खूप धाडसी आहेत. अनेक क्षेत्रात त्यांचा गहन अभ्यास आहे. त्यामुळेच ते खंबीर आणि सक्षम नेते असल्याचे नागराजन म्हणाले.

अण्णामलाई यांनी शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास आणि तरुण नेत्यांना त्यांच्या नवीन पक्षात येण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला तामिळनाडूमध्ये मोठा पाठिंबा मिळाला आहे. या पक्षाच्या साईटनुसार, हा पक्ष स्थापन होताच अवघ्या काही तासात 9.97 लाख स्वयंसेवक आणि 50 हून अधिक नेते या पक्षात दाखल झाले. तर ही मोहिम अजूनही थांबलेली नाही. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते पक्षाला जोडल्या जात आहेत. या पक्षाने सर्वसामान्यांसाठी राजकारण अशा आशयाचा उल्लेख केला आहे.

We the Leaders

माजी आयपीएस अधिकारी के. अण्णामलाई यांनी शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी वी द लीडर्स या नावाने राजकीय पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले. त्यांनी या पोस्टमध्ये पक्षाच्या साईटची लिंक शेअर केली. चला पुढे जाऊयात, एक पाऊल टाका आणि बदल करूयात, असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us