AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJI Surya Kant: लंडनमध्ये सरन्यायाधीशांना विचारला तो प्रश्न… जस्टिस सूर्यकांत यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ… काय आहे प्रकरण?

Chaos in CJI Surya Kant lecture at London: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका टिप्पणीनंतर देशात कॉकरोच जनता पार्टी ही चळवळ समोर आली. तर तिकडे दूर लंडनमध्ये सरन्यायाधीशांच्या कार्यक्रमात त्या प्रश्नानं मोठा गोंधळ उडाला. नेमकं प्रकरण तरी काय?

CJI Surya Kant: लंडनमध्ये सरन्यायाधीशांना विचारला तो प्रश्न... जस्टिस सूर्यकांत यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ... काय आहे प्रकरण?
सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या कार्यक्रमात गोंधळाचा प्रयत्नImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 06, 2026 | 10:02 AM
Share

Chaos in CJI Surya Kant lecture at London: ब्रिटन येथील युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या बिर्कबेक कॉलेजमध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाषण होते. या कार्यक्रमा दरम्यान काही लोकांनी भारतात लोकशाहीचे दमन होत असल्याचा आरोप करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनाक्रमानंतर भारतीय उच्चायुक्तालयाने या प्रकारावर तीव्र हरकत नोंदवली. सार्वजनिक ठिकाणी काही मर्यादा पाळायचे काही जण विसरतात असे उच्चायुक्तलयाने फटकारले.

AI आणि आंतरराष्ट्रीय कायद्यावर विशेष मार्गदर्शन

सरन्यायाधीश सूर्यकांत हे 4 जून रोजी बिर्कबेक कॉलेजमधील कार्यक्रमात सहभागी झाले. येथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायदा या विषयावर त्यांचे मार्गदर्शन होते. त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास होता. त्यावेळी एका महिलेने देशातील असहिष्णुता आणि लोकशाहीवरील दबावावर प्रश्न विचारला. त्याने हा मुद्दा उचलला. याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतातील आणि आंतरराष्ट्रीय अनेक कायदेतज्ज्ञांनी भारतात मतभेद वाढले आहेत. दोन समाजातील वाढत्या शत्रुत्वाविषयी चिंता व्यक्त केली आहे. हाच कल सरन्यायाधीशांच्या भाषणातही दिसला असा आरोप ही महिला करत असल्याचे व्हिडिओत दिसते.

कॉकरोच आणि पॅरासाईट वक्तव्यावर टिप्पणी

या दरम्यान या महिलेने सरन्यायाधीशांना त्यांनी नुकत्याच केलेल्या ‘कॉकरोच’ आणि ‘पॅरासाईट’ संबंधीच्या वक्तव्याची आठवण करून दिली. त्यावर सवाल उपस्थित केला. पण आयोजकांनी महिलेला मुख्य विषय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायदा यावर प्रश्न विचारण्यास सांगितले. इतर प्रश्नांचा विचार केल्या जाणार नसल्याचे सांगितले.

भारतीय उच्चायुक्तालयाने फटकारले

दरम्यान भारतीय उच्चायुक्तालयाने या सर्व प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. एखाद्या व्यक्तीने अति महत्त्वाच्या कार्यक्रमात असा व्यत्यय आणणे योग्य नसल्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी वर्तनाच्या मर्यादेचे हे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. लोकशाही देशात मतभेद हे स्वाभाविक आहे. पण भावना सभ्य आणि आदरपूर्वक पद्धतीने व्यक्त झाल्या पाहिजे असे उच्चायुक्तालयाने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र, विद्यापीठ आणि सार्वजनिक ठिकाणी संवादाची एक पद्धत असते. तसे वर्तन ठेवणे आवश्यक असते. कोणत्याही कार्यक्रमात अशा पद्धतीने व्यत्यय आणणे चांगल्या लोकशाहीचे निश्चितच लक्षण नाही, अशी टिप्पणीही करण्यात आली.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात