AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Commonwealth Games 2026 स्पर्धेत भारताचं पहिलं पदक निश्चित, कसं काय? सविस्तर जाणून घ्या

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. पण या स्पर्धेची ओपनिंग सेरेमनी होण्यापूर्वीच भारताचं एक पदक निश्चित झालं आहे. असं कसं काय? तर लवलीन बोरगोहेन हीला उपांत्य फेरीचं थेट तिकीट मिळालं आहे. पुढे सविस्तर समजून घ्या.

Commonwealth Games 2026 स्पर्धेत भारताचं पहिलं पदक निश्चित, कसं काय? सविस्तर जाणून घ्या
Commonwealth Games 2026 स्पर्धेत भारताचं पहिलं पदक निश्चित, कसं काय? सविस्तर जाणून घ्याImage Credit source: Getty Images
| Updated on: Jul 23, 2026 | 2:25 PM
Share

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा चार वर्षांनी होत आहे. या स्पर्धेत जगभरातील 3000हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेला अजून सुरूवात झालेली नाही. पण भारताचं पहिलं पदक मात्र निश्चित झालं आहे. भारताची स्टार महिला बॉक्सर आणि ऑलिपम्पिक पदक विजेती लवलीना बोरगोहेनला पदक मिळणार हे जवळपास ठरला आहे. तिच्या 75 किलो वजनी गटात तिला बाय मिळाला आणि कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळालं आहे. उपांत्य फेरी गाठल्याने तिचं कांस्य पदक तर निश्चित झालं आहे. म्हणजेच स्पर्धेत निकाल काहीही लागला तर बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिला पदक मिळणार हे ठरलं आहे. या बातमीमुळे भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर इतर स्पर्धकानाही यामुळे स्फुरण मिळणार आहे.

लवलीनाचा पदक मिळणार हे कसं ठरलं?

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत लवलीना बोरगोहेन हीने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तिचा सामना 31 जुलैला होणार आहे. हा सामना जिंकल्यास तिला सुवर्ण पदकासाठी पुढचं तिकीट मिळणार आहे. पण हा सामना गमावला तर कांस्य पदक हे निश्चित झालं आहे. मग प्रश्न असा पडतो की, दुसऱ्या उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या स्पर्धकाचं काय? त्याला पदक मिळणार नाही का? तर कॉमनवेल्थ गेम्स आणि ऑलिम्पिकसारख्या मोठ्या बॉक्सिंग स्पर्धांमध्ये एक नियम आहे. या नियमानुसार उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही खेळाडूंना कांस्य पदक दिले जाते. तिसऱ्या स्थानासाठी वेगळा सामना खेळला जात नाही. त्यामुळे लवलीनाला थेट उपांत्य फेरीचं तिकीट मिळाल्याने तिचं किमान कांस्य पदक निश्चित झालं आहे.

इतर लढती कशा होणार?

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत लवलीना बोरगोहनची लढत 31 जुलैला तुवालू देशाच्या टॅरोन ताफाकी हिच्याशी होणार आहे. 75 किलो वजनी गटात दोघी पुढच्या फेरीसाठी लढणार आहेत. या सामन्यात लवलीनाने विजय मिळवल्यास ती सुवर्ण किंवा रजत पदकाच्या शर्यतीत असेल. अंतिम सामना जिंकला तर सुवर्ण पदक मिळेल. अन्यथा रजत पदकावर समाधान मानावं लागेल. दरम्यान, या गटात पाच स्पर्धक असल्याने दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील एक स्पर्धकही ठरली आहे. इंग्लंडच्या मॅरी केट स्मिथला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं आहे. तर दुसरा स्पर्धक उपांत्यपूर्व फेरीतील लढतीनंतर निश्चित होईल. उपांत्यपूर्व फेरीचा सामना 27 जुलैला होणार आहे. हा सामना पॅट्रिशिया म्बाटा (नायजेरिया) आणि शॅशोने वेब्स्टर (जमैका) यांच्यात होणार आहे. यातील विजेता उपांत्य फेरीत मॅरी केटशी लढत करेल. हा सामना देखील 31 जुलैला आहे.

Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...