AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4.25 लाखांचा बंगला, लाकडे विकून केली 11.5 लाखांची कमाई, आज यांच्या पालीमधील बंगल्याची किंमत किती?

जितेंद्र यांनी 4.25 लाख रुपयांमध्ये खरेदी केलेला भारत भूषण यांचा बंगला. बंगला पाडल्यानंतर फक्त त्यामधील लाकडे विकूनच केलेली 11.5 लाख रुपयांची कमाई. आज त्या बंगल्याची किंमत ऐकून बसेल धक्का.

4.25 लाखांचा बंगला, लाकडे विकून केली 11.5 लाखांची कमाई, आज यांच्या पालीमधील बंगल्याची किंमत किती?
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 23, 2026 | 2:27 PM
Share

80 च्या दशकातील दिग्गज अभिनेते जितेंद्र हे केवळ आपल्या गाजलेल्या चित्रपटांसाठीच नाही तर रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठीही ओळखले जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित पाली हिल परिसरातील बंगला खरेदी करण्यामागची रंजक कहाणी सांगितली आहे. हा बंगला त्यांनी त्या काळातील प्रसिद्ध अभिनेते भारत भूषण यांच्याकडून केवळ 4.25 लाख रुपयांना विकत घेतला होता. आज त्याच जागेची किंमत सुमारे 450 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते.

‘द रिअल्टी ड्राइव्ह’ला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र यांनी सांगितले की, ‘बैजू बावरा’सारखा सुपरहिट चित्रपट देणारे अभिनेते भारत भूषण एका काळात गंभीर आर्थिक संकटातून जात होते. आर्थिक अडचणींमुळे त्यांना पाली हिलमधील आपला आलिशान बंगला केवळ 4.25 लाख रुपयांना विकण्याची वेळ आली होती. त्या काळाच्या आठवणी सांगताना जितेंद्र म्हणाले, ‘भारत भूषण हे त्या काळातील मोठे स्टार होते. ते स्वतः माझ्याकडे त्यांचा पाली हिलमधील बंगला विकण्याचा प्रस्ताव घेऊन आले. मी ही गोष्ट वडिलांना सांगितली. ते म्हणाले, ‘चला, आपणही एक बंगला घेऊया.’

ते पुढे म्हणाले, ‘त्याआधी आमचे कुटुंब अत्यंत साधे आणि मध्यमवर्गीय परिस्थितीत राहत होते. आम्ही आठ जण एका चाळीतील अवघ्या 20 बाय 10 फुटांच्या खोलीत राहत होतो. अखेर मी तो बंगला 4.25 लाख रुपयांना विकत घेतला. विशेष म्हणजे या व्यवहारात 3450 चौरस फुटांचा प्लॉटही समाविष्ट होता.’

नवं घर अन् पहिले चार चित्रपट ठरले फ्लॉप

जितेंद्र यांनी सांगितले की, बंगला खरेदी करून ते तेथे राहायला गेल्यानंतर त्यांच्या सलग चार चित्रपटांना अपयश आले. त्यामुळे त्यांना भीती वाटू लागली की, आपलेही भविष्य भारत भूषण यांच्यासारखे होईल की काय. या भीतीमुळे त्यांनी तो बंगला सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुढील काळात हीच मालमत्ता त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक फायदेशीर गुंतवणुकींपैकी एक ठरली.

केवळ लाकडातूनच मिळाले तिप्पट पैसे

काही वर्षांनी एका डेव्हलपरने त्या जागेच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव दिला. जितेंद्र यांनी तो स्वीकारला. बंगला पाडताना त्यामध्ये वापरण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या सागवान लाकडाची विक्री करण्यात आली.

याबाबत जितेंद्र म्हणाले, ‘तुमचा विश्वास बसणार नाही, पण बंगला पाडल्यानंतर त्यातील लाकडासाठी मला 11.5 लाख रुपये मिळाले. मी संपूर्ण बंगला 4.25 लाख रुपयांना विकत घेतला होता आणि केवळ त्यातील लाकूड विकूनच मूळ खरेदी किमतीच्या जवळपास तीनपट रक्कम मिळाली.’

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच