AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mirzapur The Movie box office collection: मिर्झापूरचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! कमाईचा आकडा वाचून तुम्ही देखील थक्क व्हाल

Mirzapur The Movie box office collection: शुक्रवारीही बॉक्स ऑफिसवर मिर्जापुर द मूवी या सिनेमाचा दबदबा पाहायला मिळाला. या चित्रपटांने गुरुवारीही धमाकेदार कमाई केली. चला जाणून घेऊया या सिनेमा आतापर्यंत किती कमाई केली आहे.

Mirzapur The Movie box office collection: मिर्झापूरचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! कमाईचा आकडा वाचून तुम्ही देखील थक्क व्हाल
mirzapur the movieImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 12, 2026 | 7:32 AM
Share

बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपटांनी पूर्णपणे कब्जा केला आहे. एक क्राइम थ्रिलर मिर्जापुर द मूवी आणि दुसरा डिवोशनल ड्रामा हनुमान अंश. हे दोन्ही जबरदस्त कमाई करत आहेत आणि सिनेमागृहांमधील इतर चित्रपटांवर भारी पडत आहेत. यांच्यापुढे यशच्या टॉक्सिकने दमच सोडला आहे. चला, जाणून घेऊया की शुरुवारी यापैकी कोणी किती कलेक्शन केले आहे?

मिर्जापुर द मूवीने गुरुवारी किती कमाई केली?

मिर्जापुर द मूवीला सिनेमागृहांमध्ये रिलीज होऊन 8 दिवस झाले आहेत आणि या काळात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या कमाईने सर्वांना थक्क केले आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार ‘मिर्जापुर द मूवी’ने रिलीजच्या 8व्या दिवशी म्हणजे शुरुवारी 9 कोटींची कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाचे भारतीय बॉक्स ऑफिसवर 8 दिवसांचे एकूण नेट कलेक्शन आता 187.55 कोटी रुपये झाले आहे. तर जगभात सिनेमाने 255.55 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

टॉक्सिकने कलेक्शन किती?

यशच्या मोठ्या बजेटमध्ये बनलेल्या टॉक्सिकने दुसऱ्या आठवड्यातच दम सोडला आहे. रिलीजच्या १५व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या बुधवारी हा सिनेमा फक्त 60 लाख रुपये कमावू शकला होता. आता सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार टॉक्सिकने रिलीजच्या 17व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या शुक्रवारी 26 लाख रुपयांचे कलेक्शन केले आहे. यासोबतच टॉक्सिकची भारतात 17 दिवसांची एकूण नेट कमाई आता 296.60 कोटी रुपये झाली आहे.

हनुमान अंशने किती कमाई केली?

हनुमान अंश बॉक्स ऑफिसवर पूर्ण वेगाने धावत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन पाच आठवडे झाले असले तरी कमाई मात्र थांबायचे नाव घेत नाहीये. रिलीजच्या 36व्या दिवशी म्हणजे पाचव्या शुक्रवारी या चित्रपटाने 10.50 कोटींची कमाई केली होती.

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा