AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच

Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच

| Updated on: Sep 11, 2026 | 3:58 PM
Share

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेस आणि आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. ब्रिक्स परिषदेवरून काँग्रेसचा मोदीद्वेष स्पष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले. आदित्य ठाकरेंना मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा आयोजित करण्याचे आव्हान देत त्यांनी मूर्तीपूजा आणि वंदे मातरम् स्वीकृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एमपीसी चौकशी, नांदेड विकास आणि दिशा सालियन प्रकरणावरही भातखळकर यांनी परखड मते मांडली.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर काँग्रेस आणि आदित्य ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. ब्रिक्स परिषदेच्या आयोजनावरून काँग्रेस मोदीद्वेषाने आंधळी झाली असून, हा द्वेष आता देशद्वेषात परावर्तित झाल्याचे भातखळकर यांनी म्हटले. गरबा उत्सवातील मुस्लिम प्रवेशावरून निर्माण झालेल्या वादावर बोलताना, भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंना थेट आव्हान दिले. जर आदित्य ठाकरेंना मुस्लिमांचा गरब्यात सहभाग इतका महत्त्वाचा वाटत असेल, तर त्यांनी मातोश्रीवरच दांडियाचे आयोजन करून दिनू मोरियाला घेऊन नाचावे, असे भातखळकर म्हणाले. मुस्लिमांना गरब्यातील मूर्तीपूजा आणि वंदे मातरम् मान्य आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय, एमपीसी परीक्षेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याच्या निर्णयावर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले. राऊत यांना संसदीय परंपरांचे ज्ञान नसल्याचा आरोप त्यांनी केला. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंनी हस्तक्षेप का केला, याचा खुलासा त्यांनी करावा, अशी मागणी करत सीबीआय योग्य तपास करेल असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला.

Published on: Sep 11, 2026 03:58 PM

Follow Us