AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...

Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले…

| Updated on: Sep 11, 2026 | 4:06 PM
Share

अंबादास दानवे यांनी पुन्हा गुणरत्न सदावर्ते यांचा श्वान असा उल्लेख करत प्रत्युत्तर देण्याचे आव्हान दिले आहे. यावर सदावर्ते यांनी संताप व्यक्त करत दानवे यांना जशास तसे उत्तर मिळेल अशी तीव्र शब्दांत धमकी दिली आहे. या शाब्दिक युद्धामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे.

नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा श्वान असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. दानवे यांनी सदावर्ते यांना आव्हान देत, “मला उत्तर देऊन दाखवावे,” असे म्हटले आहे. यापूर्वीही दानवे यांनी सदावर्ते यांच्याबद्दल असेच वक्तव्य केले होते, ज्यावर सदावर्ते यांनी जशास तसे उत्तर मिळेल असा इशारा दिला होता.

दानवे यांच्या ताज्या उल्लेखाला गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. सदावर्ते म्हणाले, “तुम्ही जर मला तेवढं घाणेरडं बोलत असाल, तेवढं जर खालच्या स्तरावर बोलत असाल, तर वात्रट टीकेतून जर उद्या तुम्हाला जर कोणी जोड्याची भाषा केली, तर त्यात काय नवल राहणार नाही. अंबादास, मी तुला समजावत आहे. एकवेळ तू चूक केलीस, मी समजू शकतो की तुला टीआरपी पाहिजे. पण यानंतर जर अंबादास तू पुन्हा चूक केलीस, तर मी तुला हक्काचा दम देत आहे. अंबादास, लक्षात ठेव, जशास तसं उत्तर दिलं जाईल.”

या आरोपांना प्रत्युत्तर देताना अंबादास दानवे यांनी सदावर्ते यांना “सरकारनी, फडणवीसांनी पाळलेला श्वान” असे संबोधले. ते पुढे म्हणाले की, “गुणरत्न सदावर्ते काय उत्तर देणार? ते फक्त बाकीच्यांना उत्तर देत असतील, मला देऊन दाखवा.” या शाब्दिक युद्धामुळे दोन्ही नेत्यांमधील तणाव अधिकच वाढला आहे. हा वाद महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः मराठा आरक्षण, विद्यार्थी आंदोलन यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवरून सुरू असलेल्या चर्चांमध्ये आणखी भर घालत आहे.

 

 

Published on: Sep 11, 2026 04:06 PM

Follow Us