Vastu Shastra : गुरुवारी करा पिवळ्या मोहरीचा हा खास उपाय, आयुष्यातील सर्व अडचणी झटक्यात होतील दूर
हिंदू धर्मशास्त्रानुसार गुरुवार हा भगवान विष्णू आणि गुरु ग्रहाला समर्पित वार आहे. या दिवशी काही खास उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर होतात. घरात सुख शांती अन् समृद्धी येते. चला तर मग आज आपण असाच एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत.

आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात काही छोट्या -छोट्या चुका करत असतो. या चुकांमुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. नकारात्मक ऊर्जेमुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो, यालाच ऊर्जा संतुलन बिघडले असं म्हटलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये ऊर्जा संतुलन महत्त्वाचे मानले जाते, कारण जेव्हा तुमच्या घरातील ऊर्जा संतुलन बिघडतं, तेव्हा तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. घरातील ऊर्जा संतुलन टिकून रहावं, नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी व्हावा, तसेच घरात सुख, शांती आणि समृद्धी यावी यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय फक्त गुरुवारच्या दिवशीच करायचा आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये गुरुवार हा वार भगवान विष्णू आणि गुरु ग्रह यांना समर्पित आहे. चला तर मग आज आपण अशाच एका उपायाबद्दल जाणून घेऊयात, ज्यामुळे तुमच्या प्रगतीमधील सर्व प्रकारचे अडथळे दूर होण्यास मदत हेईल.
तुमच्या घरात जर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढला असेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. एका छोट्या पिवळ्या सुती कापडामध्ये एक मुठभर पिवळी मोहरी घ्या, त्या मोहरीमध्ये एक कापूर देखील घ्या. याची एक व्यवस्थित पोटली तयार करा आता ही पोटली तुमच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजुला बांधून ठेवा. यामुळे तुमच्या घरात बाहेरून येणारी कोणतीही नकारात्मक ऊर्जा कधीच प्रवेश करू शकणार नाही, त्यामुळे तुमच्या घरातील ऊर्जा संतुलन कायम राहण्यास मदत होते. या उपायामुळे जर तुमच्या कामात सातत्याने अडथळे येत असतील तर ते देखील दूर होतात.
संपत्ती आणि पैशांसाठी उपाय
गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठा, अंघोळ केल्यानंतर 21 पिवळ्या मोहरीचे दाने घ्या, त्यामध्ये एक कवडी देखील टाका. आता या पिवळ्या मोहरीचे दाने आणि ती कवडी एका काचेच्या बरणीमध्ये टाकून ती बरणी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्या.वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही हा उपाय केला तर अर्थप्राप्तीचे सर्व मार्ग तुमच्यासाठी खुले होतात. पैसा जर जास्त प्रमाणात खर्च होत असेल तर त्यावर देखील नियंत्रण येतं, तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतात. तुमची तिजोरी पैशांनी भरेलेली राहते, एवढंच नाही तर तुमच्यावर कर्ज झालं असेल तर त्यातून देखील तुम्हाला मुक्ती मिळते, असा दावा वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
