AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हिऱ्यांपेक्षाही मौल्यवान आहेत ही 3 रत्ने, चाणक्य म्हणतात गैरवापर केला तर विनाश अटळ

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या जगात अशा तीन गोष्टी आहेत, ज्या हिऱ्यांपेक्षाही मौल्यवान आहेत. जर तुम्ही या गोष्टींचा गैरवापर केला, गरजेपेक्षा जास्त वापर केला तर एक दिवस जगाचा अंत निश्चित आहे.

Chanakya Niti : हिऱ्यांपेक्षाही मौल्यवान आहेत ही 3 रत्ने, चाणक्य म्हणतात गैरवापर केला तर विनाश अटळ
Chanakya Niti Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 26, 2026 | 7:37 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील माणसाला मार्गदर्शनाचं काम करतात. माणसाने आयुष्य कसं जगावं? आयुष्यात काय करावं? आणि काय करू नये, याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात अशा तीन गोष्टी आहेत, ज्या हिऱ्यापेक्षाही मौल्यवान आहेत. त्यामुळे या गोष्टींचा वापर हा जपून तसेच तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हाच केला पाहिजे. गरज नसताना जर तुम्ही या गोष्टींचा वापर करत असाल तर मात्र एक दिवस या संपूर्ण जगाचा विनाश अटळ आहे. त्यामुळे या तीन गोष्टींचा गैरवापर होता कामा नये, चला तर मग जाणून घेऊयात या तीन गोष्टी नेमक्या काय आहेत? आणि चाणक्य यांनी काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

पाणी – चाणक्य म्हणतात या जगात पाणी आहे तर जीवन आहे. ज्या दिवशी पृथ्वीवरचं पाणी संपूर्णपणे नष्ट होईल, पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही, तेव्हा हे जग देखील नष्ट होईल. या जगात सजीवांचं अस्तित्व संपलेलं असेल. त्यामुळे पाण्याचा वापर हा जपूनच केला पाहिजे. पाणी पुढच्या पिढ्यांसाठी वाचवलं पाहिजे, आज तुम्ही जेवढं पाणी वाचवलं तेवढं तुमच्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य उज्जवल होईल, सुरक्षित होईल, त्यामुळे या जगात पाणी हे फार महत्त्वाचं आहे. पाणी हे मौल्यवान आहे, त्यामुळे पाण्याची बचत ही केलीच पाहिजे, पाण्याचा गैरवापर टाळवा, असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.

अन्न – चाणक्य म्हणतात या जगात जेवढं महत्त्व पाण्याला आहे, तेवढंच महत्त्व अन्नाला आहे. तुम्हाला अन्न मिळतं म्हणून ते गरजेपेक्षा जास्त खाणं किंवा त्याची नासाडी करणं हा अक्षम्य असा अपराध आहे. कारण जगात असे अनेक लोक असतात, ज्यांना दररोज पोटभर जेवण देखील मिळत नाही. त्यामुळे तुमच्याकडे असलेलं अन्न कधीही वाया घालू नका, जर तुमच्याकडे जास्त अन्न असेल तर ते दान करा, या जगात अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

गोड शब्द – चाणक्य म्हणतात माणसाच्या डोक्यावर नेहमी बर्फ असावा आणि जीभेवर साखर, जो माणूस गोड बलतो, त्याला त्याच्या आयुष्यात कधीच अडचण येत नाही, तुमच्याकडे असलेले तुमचे गोड शब्द हा एक मौल्यवान ठेवा आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार...
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, क्लिप बनवणारा.
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, ही क्लिप बनवणाऱ्या व्यक्तीबाबत मोठी माहिती
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना...
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना फडणवीसांची स्पष्ट भूमिका