AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, दोन बड्या नेत्यांनी सोडली पक्षाची साथ, घेतला मोठा निर्णय

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपला मोठा धक्का बसला आहे. दोन बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली असून, मोठा निर्णय घेतला आहे. राजकारणात घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे.

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, दोन बड्या नेत्यांनी सोडली पक्षाची साथ, घेतला मोठा निर्णय
भाजपला धक्काImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 26, 2026 | 7:31 PM
Share

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं होतं, भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर एनडीएमधील घटक पक्षांच्या मदतीने भाजपने केंद्रात सरकार स्थापन केलं. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपला मोठं यश मिळालं. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली, महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये देखील भाजपने तृणमूल काँग्रेसला पराभवाची धूळ चारली. आसामध्ये देखील भाजपला मोठा विजय मिळाला. दरम्यान या सर्व विजयानंतर विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं पहायला मिळालं होतं. मात्र आता लवकरच उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे, त्यापूर्वीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे.

उत्तर प्रदेशच्या दातागंज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजप नेते सिनोद शाक्य यांनी भाजपची साथ सोडत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच बिसौली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार कुशाग्र सागर यांनी देखील समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीमध्ये या दोन्ही नेत्यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी शिवपाल सिंह यादव आणि बदायू लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदित्य यादव यांची देखील उपस्थिती होती.

सिनोद शाक्य हे 2007 आणि 2012 असे दोनदा बसपाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. पंरतु 2022 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला, दरम्यान त्यांनी आता भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन सपामध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपवर नाराज होते, अशी माहिती समोर येत आहे. हा उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान आता सपामध्ये प्रवेश केल्यानंतर सिनोद शाक्य यांना पुन्हा विधानसभेचं तिकिट दिलं जाणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपसोबतच बसपाच्या काही नेत्यांनी देखील सपामध्ये प्रवेश केला आहे.

Follow Us
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार...
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, क्लिप बनवणारा.
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, ही क्लिप बनवणाऱ्या व्यक्तीबाबत मोठी माहिती
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना...
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना फडणवीसांची स्पष्ट भूमिका