आधी प्राण्याच्या पोटात, मग कपात! या प्राण्याच्या विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या बियांपासून बनते कॉफी; जी तुम्ही रोज पिता
तुम्हाला सांगितलं की ह्या कॉफिच्या बिया एका प्राण्याच्या विष्ठेपासून बनतात तर? त्या बिया व्यवस्थित सुकवल्या जातात आणि त्यानंतर त्याची पावडर केली जाते. तीच पावडर आपण दूधामध्ये मिक्स करून कॉफी करून पितो. वाचा सविस्तर

सकाळी झोप उडवण्यासाठी आपण कॉफी पितो. पण जरा थांबा! तुम्हाला सांगितलं की ह्या कॉफिच्या बिया एका प्राण्याच्या विष्ठेपासून बनतात तर? त्या बिया व्यवस्थित सुकवल्या जातात आणि त्यानंतर त्याची पावडर केली जाते. तीच पावडर आपण म्हणून दूधामध्ये मिक्स करून कॉफी करून पितो.
ऐकायला विचित्र वाटलं तरी ही गोष्ट खरी आहे. या कॉफीचं नाव आहे कोपी लुवाक! तिच्या निर्मितीची पद्धत जितकी अनोखी आहे. तितकीच तिची किंमतही चर्चेत आहे. हा कोणता प्राणी आहे? ज्याच्या विष्ठेतून कॉफिच्या बिया मिळतात जाणून घ्या
हा प्राणी आहे सिव्हेट. हा प्राणी मांजरासारखा असला तरी तो खरा मांजर नाही. त्याला पाम सिव्हेट असंही म्हटलं जातं. हा प्राणी पिकलेली कॉफीची फळं खातो. पण या फळांमधील बिया त्याच्या पचनसंस्थेतून जाताना पूर्णपणे पचत नाही. पुढे याच बिया कोपी लुवाक कॉफी तयार करण्यासाठी वापरल्या जातात.
सिव्हेटला पिकलेली कॉफिची फळं खायला आवडतात. तो फळ खातो, त्यांचा गर पचतो आणि बिया विष्ठेतून बाहेर पडतात. आता या बिया फेकून दिल्या जात नाहीत, त्या गोळा केल्या जातात. त्यानंतर त्यांची स्वच्छता करून पुढील प्रक्रिया केली जाते.
विष्ठेतून मिळालेल्या बियांपासून थेट कॉफी बनते का?
नाही! इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. विष्ठेतून बाहेर आलेल्या बिया थेट कपात टाकल्या जात नाहीत. त्या आधी व्यवस्थित गोळा केल्या जातात. स्वच्छ केल्या जातात आणि वाळवल्या जातात. त्यानंतर बिंयांच बाहेरील आवरण काढून त्या भाजल्या जातात. या सगळ्या प्रक्रियनेनंतर कॉफी तयार होते.
कोपी लुवाकच्या खास चवीमागे सिव्हेटच्या पचनसंस्थेतील एन्झाईम्सचा वाटा असतो. त्यामुळे या बिया महाग आहेत. कोपी लुवाक कॉफीचा संबंध इंडोनेशियाशी आहे. तिथून कॉफीला विशेष ओळख मिळाली. तिच्या निर्मितीची वेगळी पद्धत आणि खास चवीमुळे तिला जगभराच्या बाजारात प्रसिद्धी मिळाली.
