AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रह्मपुत्र नदीवरील चीनी धरणाचा मोठा धोका, भारत आणि बांग्लादेशाच्या चिंतेत वाढ, संशोधक म्हणाले की….

चिनी संशोधकांनी ब्रह्मपुत्रा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढण्याचा आणि पुराचा धोका असल्याचा इशारा दिला आहे, ज्यामुळे भारत आणि बांगलादेशच्या चिंतेत वाढ झाली आहे.

ब्रह्मपुत्र नदीवरील चीनी धरणाचा मोठा धोका, भारत आणि बांग्लादेशाच्या चिंतेत वाढ, संशोधक म्हणाले की....
Major threat from Chinese dam on the Brahmaputra
| Updated on: Oct 26, 2026 | 8:34 PM
Share

चीनच्या संशोधकांच्या अलिकडच्या इशाऱ्यानंतर भारत आणि बांग्लादेशाची चिंता वाढविली आहे. या शतकाच्या दरम्यान ब्रह्मपूत्र नदीच्या पाण्याच्या वेग वाढण्याचा शक्यता वाढणार आहे. ज्यामुळे पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या इशाऱ्यानंतर तिबेटमध्ये या नदीवर चीनद्वारे बांधला जाणारा १६८ अब्ज डॉलरचा मेगा धरण योजनेच्या संभाव्य धोका आणि प्रभावासंदर्भात नव्याने चर्चा सुरु झाली आहे.

चीन संशोधन अकादमी आणि युन्नान युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी दक्षिण पूर्व तिबेट पठारावरुन झाडांच्या खोडांच्या वलयांचा रुंदीचा डेटा जमा केला. त्यामुळे १३२५ ते २०२० पर्यंतच्या नदी प्रवाहाच्या इतिहासाची पुनर्रचना करण्यास मदत झाली आहे. या ऐतिहासिक डेटाला आधुनिक पर्यावरणीय आकड्यांशी मिळवून एक नवीन मॉडेल विकसित केले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने सोमवारी सांगितले की हे संशोधन ८ ऑक्टोबर रोजी चायना सायन्स बुलेटिन नावाच्या प्रसिद्ध जर्नलमध्ये प्रकाशित झाले होते. संशोधकांचे म्हणणे आहे की हे मॉडेल भविष्यातील जलवायू परिस्थितीत नदीचा प्रवाहात वाढ आणि पूर सारख्या घटना वाढण्याची शक्यता दर्शवते.

भारतासाठी का आहे महत्वाचे ?

तिबेटमध्ये ब्रह्मपूत्र या नदीला ‘यारलुंग त्सांगपो’नावाने ओळखले जाते.ही नदी अरुणाचल प्रदेशातील सियांगच्या रुपात भारतात प्रवेश करते आणि पुढे जाऊन ब्रह्मपूत्र नदीचे स्वरुप झाले आहे. ही नदी पूर्वोत्तर भारत आणि बांग्लादेशातील कोट्यवधी लोकांसाठी शेती हा उपजीविकेचा आणि परिसंस्थेचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे.

जलसंपदा विकास किंवा साठवणूक पायाभूत सुविधांचे नियोजन करताना, किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणाऱ्या नद्यांवरील धोक्यांचे मूल्यांकन करताना, नदीच्या प्रवाहातील या संभाव्य बदलांचा विचार केला पाहिजे अशी शिफारस आता संशोधकांनी केली आहे.

एका भव्य धरण प्रकल्पामुळे वाढणारे धोके

तिबेटमध्ये बांधल्या जात असलेल्या या महाकाय धरण प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे १६८ अब्ज डॉलर्स आहे. यामध्ये पाच जलविद्युत केंद्रांचा समावेश आहे. जरी याचा अधिकृत उद्देश वीज निर्मिती करणे हा असला तरी, नदीच्या वरच्या बाजूस असलेल्या एवढ्या मोठ्या प्रकल्पामुळे खालच्या भागातील पाण्याचा प्रवाह, पूर व्यवस्थापन आणि पर्यावरणीय परिणामांबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

भूकंपाची सक्रीय फॉल्ट लाइन

या मोठ्या प्रकल्पामुळे चीनला पाणी सोडण्याची वेळ आणि प्रमाण नियंत्रित करण्याची ताकद मिळणार आहे. संशोधकांची चिंता केवल पाण्याचा तीव्र प्रवाहाचीच नाही तर धरणाच्या अगदी खाली भूकंपाची सक्रीय फॉल्ट लाइन अस्तित्वात आहे, ज्याने धरणाची मजबूती आणि सुरक्षेला मोठा धोका उदभवू शकतो. हिमालयीन प्रदेशात नैसर्गिक आपत्तींचा धोका किती भयंकर असू शकतो हे 26 ऑगस्ट रोजी चीन-नेपाळ सीमेवर अचानक आलेला पूराने स्पष्ट झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत नेपाळचे मोठे नुकसान झाले आणि हजारो लोक मरण पावले होते.

Follow Us
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार...
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, क्लिप बनवणारा.
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, ही क्लिप बनवणाऱ्या व्यक्तीबाबत मोठी माहिती