AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Rashi Bhavishya : आजचा तुमचा दिवस कसा जाणार? काही राशींना मिळणार यश, तर काहींनी राहावं सावध

Horoscope Today 24 October 2026: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन येणार, याबाबत उत्सुकता आहे का? ग्रहांच्या स्थितीनुसार काही राशींना कामात यश मिळण्याची, तर काहींना आर्थिक आणि वैयक्तिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. जाणून घ्या, मेष ते मीन या सर्व राशींसाठी आजचा दिवस कसा असेल.

Today Rashi Bhavishya : आजचा तुमचा दिवस कसा जाणार? काही राशींना मिळणार यश, तर काहींनी राहावं सावध
Astrology
| Edited By: | Updated on: Oct 24, 2026 | 7:16 AM
Share

शनिवार हा हिंदू धर्मात शनिदेव आणि हनुमानाच्या पूजेसाठी विशेष महत्त्वाचा दिवस मानला जातो. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी शनिवार असून, या दिवसाच्या ग्रह स्थितीचा विविध राशींवर कसा परिणाम होऊ शकतो, याबाबत ज्योतिषशास्त्रात अंदाज वर्तवण्यात आले आहेत. काही राशींना नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तर काहींना नातेसंबंध आणि खर्चाच्या बाबतीत सावध राहावं लागू शकतं. जाणून घेऊया, मेष ते मीन या सर्व राशींसाठी शनिवारचा दिवस कसा ठरू शकतो.

मेष

आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. अनावश्यक खर्च टाळा. एखाद्या गोष्टीबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घाईघाईने घेऊ नका. मानसिक तणाव जाणवू शकतो. स्वतःसाठी वेळ काढा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ

कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहिल. वैवाहिक नात्यात गोडवा वाढेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर योग्य माहिती घेऊन निर्णय घ्या. उत्पन्नाच्या विविध मार्गांतून आर्थिक लाभ मिळू शकतो.

मिथुन

नवीन उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. महत्त्वाचे निर्णय घेताना अधिक स्पष्टपणे विचार करता येईल. एखादं आव्हानाबाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न यशस्वी ठरू शकतो. विनाकारण वाद घालणं टाळा. शांतपणे आणि समजूतदारपणे परिस्थिती हाताळा.

कर्क

नवीन बदलांसाठी तयार राहा. कामातील मेहनत आणि समर्पणामुळे चांगले परिणाम मिळू शकतात. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना महत्त्व मिळेल. आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळेल. ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.

सिंह

कामांमध्ये यश मिळू शकते. नवीन संधींचा फायदा घेता येईल. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील ध्येयांवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं ठरेल. एखादी नवीन जबाबदारी किंवा संधी मिळाल्यास ती गांभीर्याने घ्या. आत्मविश्वास आणि सातत्याच्या जोरावर अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करा.

कन्या

आयुष्यात काही सकारात्मक बदल घडू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहिल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. बदलत्या परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण अनुभवता येऊ शकतात.

तूळ

जोडीदारासोबत एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतात. त्यामुळे संवाद साधताना संयम ठेवा आणि गैरसमज वाढू देऊ नका. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळून बजेटनुसार नियोजन करा. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणापासून दूर राहणं आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणं फायदेशीर ठरेल.

वृश्चिक

नवीन संधी निर्माण होईल. प्रेमसंबंधांमध्ये उत्साह वाढू शकतो. एखाद्या नवीन व्यक्तीशी ओळख होऊ शकते. आधीपासून नात्यात असलेल्या व्यक्तींनाही नात्यातील नवीन पैलू अनुभवता येतील. आर्थिक लाभ होईल. नवीन संपर्क निर्माण करताना समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा.

धनु

वैयक्तिक नात्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जोडीदारासोबत काही अडचणी निर्माण झाल्यास रागावण्याऐवजी शांतपणे चर्चा करून मार्ग काढा. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या पूर्ण करताना अनावश्यक ताण घेऊ नका. योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास परिस्थिती हाताळणं सोपं जाईल.

मकर

कामातील मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. नवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी किंवा ठरवलेली उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी अनुकूल संधी मिळेल. प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. पुढील प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करणं महत्त्वाचं ठरेल.

कुंभ

काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. घाई न करता संयमाने परिस्थिती हाताळा. अडचणी आल्या तरी आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नका. मेहनत आणि सातत्याच्या जोरावर मार्ग निघू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार करा. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी आवश्यक माहिती तपासा.

मीन

आर्थिक स्थिती समाधानकारक राहिल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी नियोजन सुरू करता येईल. गुंतवणूक किंवा व्यवसायाचा विस्तार करण्याबाबत विचार होऊ शकतो. मात्र निर्णय घेताना योग्य माहिती घेणं आवश्यक आहे. आज केलेले प्रयत्न भविष्यात उपयोगी ठरू शकतात.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…