झुरळांकडून थेट या देशात सत्तापालट, विद्यार्थ्यांचे देशभरात आंदोलन आणि 15 वर्षांची..
विद्यार्थी काय करू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले, ज्याने जगात तूफान चर्चा ही रंगताना दिसत आहे. फक्त भारतच नाही तर जगभरातील अनेक देशात विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत. विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून थेट सत्तापालट केली आहे.

विद्यार्थ्यांची आंदोलने अनेक देशात होत आहेत. फ्रान्स आणि जर्मनी यासारख्या देशात वाढलेली महागाई विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. भारतातरी कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन झाले. आता तर काय एका देशात थेट 15 वर्षांची सत्ता उलथून झुरळांनी टाकली. फक्त भारतच नाही तर अनेक देशात सरकारच्या धोरणांविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. जर्मनीमध्येही तर मोठी जाळपोळही झाले. सर्बियात थेट कॉकरोचांच्या आंदोलनानंतर सत्तापालट झाली. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेले सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिच यांना संसदीय निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणुकीकडे जगाच्या नजरा होत्या. भ्रष्टाचार आणि लोकशाही संस्थांच्या ऱ्हासाविरुद्ध दोन वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाठिंबा असलेल्या स्टुडंट्स लिस्ट या विरोधी पक्षाचे तब्बल 250 खासदार निवडून आले.
ही निवडणूक बाल्कन प्रदेशातील या राष्ट्राच्या राजकारणात एक मोठा बदल घडवणारी ठरत आहे. अलेक्झांडर वुचिच यांच्या पक्षाचे गेल्या 14 वर्षांपासून सत्तेवर वर्चस्व होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा पाठिंबा असलेले वुचिच यांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला परकीय शक्तींचा पाठिंबा असल्याचे मोठे विधान केले. विद्यार्थी नक्की काय करू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले.
या निकालानंतर विद्यार्थी मोठ्या संख्येने राजधानी बेलग्रेडसह सर्बियाच्या अनेक शहरात रस्त्यावर उतरले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने गाणे लावून डान्स करतानाही दिसले. बॅरिकेड्स काढून रात्रभर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. विजयानंतर मोठी जबाबदारी मिळाल्याचेही विद्यार्थ्यांनी म्हटले. हा प्रत्येक नागरिकाचा विजय असल्याचे विधान केले. 16 जणांच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांनी देशभरात आंदोलन पुकारले.
रेल्वे स्टेशनचा छत कोसून त्यावेळी 16 जणांचा जीव गेला. घराणेशाही, भ्रष्टाचार, सरकारी कामात निष्काळजीपणा हे मुद्दे पुढे करत विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले. त्यानंतर हे आंदोलन इतरे जास्त पेटले की, थेट 15 वर्षांची सत्ता हातून गेले. या निवडणुकीची जोरदार चर्चा ही सुरू आहे. अनेक देशात सरकारच्या धोरणाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत.
