AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC Student Protest Hearing : विद्यार्थी समाजकंटक नाहीत, त्यांना आंदोलनाची हौस नाही; कोर्टाने फटकारले

MPSC विद्यार्थी आंदोलनावर कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले. मुख्य न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या हक्काचे समर्थन केले, ते समाजकंटक नाहीत असे स्पष्ट केले. MPSC परीक्षांमध्ये पारदर्शकता असावी आणि सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

MPSC Student Protest Hearing : विद्यार्थी समाजकंटक नाहीत, त्यांना आंदोलनाची हौस नाही; कोर्टाने फटकारले
MPSC student protestImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2026 | 12:38 PM
Share

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. तिथे येणारे विद्यार्थी संघर्ष करून शिकतात. त्यांना रस्त्यावर येण्याची हौस असेल असे आम्हाला वाटत नाही. विद्यार्थी हे समाजकंटक नाहीत. परीक्षेत काही घोळ झाला असेल तर त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, अशा शब्दात मुख्य न्यायाधीश महेश चंद्र त्रिपाठी यांनी याचिकाकर्त्यांना फटकारलं आहे. पुण्यातील अमित सुपेकर आणि सौरभ विरकर यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने याचिकाकर्त्यांना चांगलंच फटकारलं.

भरतीमध्ये काही घोळ असेल तर आंदोलन करण्याचा विद्यार्थ्यांचा हक्क आहे, असंही कोर्टाने स्पष्ट केलं. त्यावर विद्यार्थ्यांच करिअर धोक्यात येईल म्हणून आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले नाहीत, असं सरकारी वकिलांनी कोर्टाला स्पष्ट केलं.

योग्य निर्णय व्हायला हवा

विद्यार्थ्यांच्या मागण्याचा विचार करून योग्य तो पारदर्शक निर्णय व्हायला हवा. एमपीएससीच्या परीक्षा या अत्यंत पारदर्शक आणि प्रामाणिकपणे पार पडायला हव्यात हे आमच मत आहे. विद्यार्थ्यांच्या मनात तुम्ही विश्वास निर्माण केला पाहिजे. जे पालक मुलांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवतात त्यांचं त्रास समजून घ्यायला हवा, असं कोर्टाने म्हटलं. तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो पारदर्शक असायला हवा, अशी अपेक्षाही कोर्टाने व्यक्त केली.

अभ्यासावर फोकस करा

विद्यार्थ्यानी शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. त्यांनी त्यावरच लक्ष केंद्रित केल्यास त्यांचं करिअर घडेल. अन्य कोणत्याही गोष्टीवर फोकस करता कामा नये, असे आम्हाला वाटते. विद्यार्थ्यांचे इश्यू सोडवणे सरकारचे काम आहे, त्यांनी ते करावे, असं कोर्टाने म्हटलं.

तर पालकही विचार करतील

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे ही पुण्याची ओळख आहे ती तशीच राहुद्या. पुणे आंदोलनाचे केंद्र अशी ओळख बनू नये. अन्यथा अनेक पालकही मुलांना शिक्षणासाठी पाठवायचे की नाही? यावर विचार करायला लागतील, असं कोर्ट म्हणालं. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या एका समूहाने आंदोलन मागे घेणार असल्याचं कोर्टाला सांगितलं. मात्र, रोहित पवार यांच्या नेतृत्वातील विद्यार्थ्यांचं आंदोलन अद्यापही सुरूच आहे.

Follow Us
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं