AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाची कमाल; ऊस उत्पादन थेट दुप्पट, कसं शक्य झालं?

AI तंत्रज्ञानाच्या मदतीने यंदा एकरी सरासरी 120 टन उत्पादन मिळाले असून, पूर्वीच्या उत्पादनाच्या तुलनेत दुप्पट वाढ नोंदविण्यात आली आहे.

शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाची कमाल; ऊस उत्पादन थेट दुप्पट, कसं शक्य झालं?
sharad pawar and govind baugImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 22, 2026 | 7:39 PM
Share

विक्रम वरे, टीव्ही 9 मराठी, बारामती : आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये प्रभावी वापर केल्यास उत्पादनात मोठी वाढ साधता येऊ शकते, याचा प्रत्यय खासदार शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग येथे आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून गोविंद बागेत यंदा एकरी सरासरी 120 टन ऊस उत्पादन मिळाले आहे. गेल्या 15 वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत एकरी तब्बल 60 टनांची वाढ झाल्याने AI आधारित शेती प्रयोगाची चर्चा सुरू झाली आहे.

ऊस पिकासाठी या आधुनिक पद्धतीचा अवलंब

शेतीमध्ये बदलते हवामान, पाण्याचे नियोजन, खतांचा संतुलित वापर, पिकांवरील रोग-किडींचा प्रादुर्भाव आणि जमिनीची सुपीकता या बाबी उत्पादनावर मोठा परिणाम करतात. या सर्व घटकांचा अभ्यास करून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. गोविंद बागेत ऊस पिकासाठी या आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्याने उत्पादनवाढीचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

यंदा एकरी सरासरी 120 टन उत्पादन मिळाले

गेल्या 15 वर्षांतील गोविंद बागेच्या ऊस उत्पादनाचा सरासरी आकडा एकरी सुमारे 60 टन होता. मात्र, AI तंत्रज्ञानाच्या मदतीने यंदा एकरी सरासरी 120 टन उत्पादन मिळाले असून, पूर्वीच्या उत्पादनाच्या तुलनेत दुप्पट वाढ नोंदविण्यात आली आहे. यामुळे पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेती अधिक उत्पादक आणि फायदेशीर होऊ शकते, हे अधोरेखित झाले आहे.

उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते

ऊसशेतीमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास पाण्याची बचत, खतांचा योग्य वापर, पीक व्यवस्थापनातील अचूकता आणि उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. गोविंद बागेतील हा प्रयोग बारामतीसह परिसरातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीची नवी दिशा देणारा ठरू शकतो. दरम्यान, गोविंद बागेत होत असलेल्या या शेतीच्या प्रयोगाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. आधुनिक शेतीच्या मदतीने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो. पैसे वाचू शकतात, असे मत ही शेती पाहून व्यक्त केले जात आहे.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!