AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: अब्दुल समदला वाटलं आपण वाचलो; पण रिंकू सिंगच्या चपळाईने सगळा खेळच संपवला! मैदानात नेमकं काय घडलं?

Rinku Singh ran out Abdul Samad: पाकिस्तान 'अ' संघाविरुद्धच्या सामन्यात भारत 'अ' संघाचा उपकर्णधार रिंकू सिंगने कर्णधार अब्दुल समदला रनआऊट केले.

IND vs PAK: अब्दुल समदला वाटलं आपण वाचलो; पण रिंकू सिंगच्या चपळाईने सगळा खेळच संपवला! मैदानात नेमकं काय घडलं?
Pakistan Captain Falls Into Rinku Singh's Tra
| Updated on: Nov 22, 2026 | 7:33 PM
Share

रिंकू सिंगची गणना भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते. सध्या भारतीय संघाबाहेर असलेला तो आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये इंडिया ‘ए’ संघाकडून खेळत आहे. तो संघाचा उपकर्णधारही आहे. स्पर्धेच्या आठव्या सामन्यात इंडिया ‘ए’ संघाचा सामना पाकिस्तान ‘ए’ संघाशी होणार आहे. रिंकूच्या चपळाईमुळे पाकिस्तान ‘ए’ संघाचा कर्णधार अब्दुल समदला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

31 व्या षटकात, हसन नवाझने अभिषेक शर्माविरुद्ध डावातील तिसरा चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने खेळला. अब्दुल समद त्याच्यासोबत नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला होता. दोघांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तिथे रिंकू सिंग क्षेत्ररक्षण करत होता. तो वेगाने धावला आणि त्याने चेंडू यष्टीरक्षकाकडे फेकला. रिंकूचा थ्रो यष्टींच्या अगदी वर होता. कुमार कुशाग्रने सहजपणे चेंडू पकडला आणि तो यष्टीवर मारला.

झेप घेऊनही अब्दुल समद क्रीजपर्यंत पोहोचू शकला नाही. 28 वर्षीय अब्दुल समद चांगली फलंदाजी करत होता. त्याने एक चौकार आणि दोन षटकारांसह 35 चेंडूंमध्ये 28 धावा केल्या. समद आणि हसन नवाझ यांनी 65 धावांची भागीदारी केली. दोघांनी केवळ 68 चेंडूंचा सामना करत सहजपणे धावा केल्या. रिंकूच्या क्षेत्ररक्षणामुळे ही भागीदारी तुटली, ज्यामुळे इंडिया ‘अ’ संघाला काहीसा दिलासा मिळाला.

पाकिस्तानने 41 व्या षटकात 250 धावा पूर्ण केल्या आहेत. पाकिस्तानने 42 व्या षटकात आपली सहावी विकेट गमावली आहे. मोहम्मद इम्रान रंधावा 14 चेंडूंमध्ये 23 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. फरहान क्रीजवर आहे. पुरुषांच्या आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज होत आहे.

पाकिस्तानचा कर्णधार अब्दुल समदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत ‘अ’ संघाने नेपाळला 306 धावांनी पराभूत करून स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती, तर पाकिस्तान ‘अ’ संघानेही युएई रो संघाला 61 धावांनी पराभूत करून विजयाने सुरुवात केली होती. पाकिस्तानपेक्षा चांगल्या नेट रन रेटच्या आधारावर भारत ‘ब’ गटाच्या गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. यामुळे आता या सामन्यात आता को विजय मिळवणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!