AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ऑनलाईन नवेकोरे शूज केले ऑर्डर, रिटर्न करताना बॉक्समध्ये भरले फाटलेले बूट, नेटकरी संतापले!

लोकांना नवे बूट ऑर्डर केले ते घेतले आणि नाही आवडले म्हणून रिटर्न केले पण रिटर्न करताना नव्या बूटाच्या जागी त्यात जुने फाटलेले बूट भरून दिले हा प्रकार समोर आल्यानंतर विक्रेत्याला लाखोंचा फटका बसला आहे.

Video : ऑनलाईन नवेकोरे शूज केले ऑर्डर, रिटर्न करताना बॉक्समध्ये भरले फाटलेले बूट, नेटकरी संतापले!
| Updated on: Nov 22, 2026 | 7:34 PM
Share

ऑनलाईन शॉपिंग करताना ग्राहकांना कधी साबण मिळतो, कधी दगड तर कधी मागवलेल्या वस्तूऐवजी काहीतरी वेगळचं पार्सल येतं. पण उत्तर प्रदेशातील आग्रा येथे तर याच्या अगदी उलट प्रकार समोर आला आहे. लोकांना नवे बूट ऑर्डर केले ते घेतले आणि नाही आवडले म्हणून रिटर्न केले पण रिटर्न करताना नव्या बूटाच्या जागी त्यात जुने फाटलेले बूट भरून दिले. 1 ते 2 नव्हे तर तब्बल 550 बॉक्समध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर विक्रेत्याला लाखोंचा फटका बसला आहे.

550 बॉक्स उघडले अन् विक्रेत्याला धक्काच बसला

आग्रा येथील एक बूट व्यावसायिक प्लिपकार्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून आपले उत्पादन विकतो. त्याने ग्राहकांसाठी अगदी नवे बूट पॅक करून पाठवले होते. मात्र काही ऑर्डर रद्द झाल्यानंतर जेव्हा हे बॉक्स उघडण्यात आले, तेव्हा आतलं दृश्य पाहून पायाखाली जमीनच सरकली. बॉक्समध्ये नवे बूट असण्याऐवजी जुने, खराब झालेले आणि फाटलेले बूट ठेवण्यात आले होते. अशा प्रकारचे तब्बल 550 बॉक्स मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे विक्रेत्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

एका सोशल मीडिया यूजरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनेक बूटांचे बॉक्स उघडलेले दिसतात. त्यामध्ये नवीन बूटांऐवजी जुने आणि वापरून खराब झालेले बूट ठेवलेले असल्याचं दिसतं आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ऑनलाईन व्यवहार आणि रिटर्न पॉलिसीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. काही वापरकर्त्यांनी डिलिव्हरी प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची मिलीभगत असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

प्लिपकार्टनेही घेतली दखल

या घटनेवर प्लिपकार्टच्या अधिकृत सपोर्ट अकाऊंटने प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने विक्रेत्याला या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि आवश्यक तपशील थेट पाठवण्यास सांगितलं आहे. कंपनीने मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!