AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC Student Protest Hearing : आंदोलन मागे घ्या, अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा, कोर्टाच्या सूचना; एमपीएससी आंदोलनाचा तिढा सुटणार?

MPSC च्या पुणे आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने विद्यार्थ्यांना आंदोलन थांबवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. वाहतूक कोंडीमुळे त्रास होत असल्याच्या याचिकेवर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले.

MPSC Student Protest Hearing : आंदोलन मागे घ्या, अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा, कोर्टाच्या सूचना; एमपीएससी आंदोलनाचा तिढा सुटणार?
MPSC student protestImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2026 | 12:19 PM
Share

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. मुख्य न्यायाधीश महेश चंद्र त्रिपाठी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. यावेळी मुख्यन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना चांगलंच फटकारलं आहे. तसेच विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंतीही कोर्टाने केली. तुम्ही आंदोलन मागे घ्या आणि आपआपल्या कॉलेज, संस्थांमध्ये जा, असं कोर्टाने म्हटलं. त्यामुळे आता विद्यार्थी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुण्यातील अमित सुपेकर आणि सौरभ विरकर यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊन लोकांना त्रास होत असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. गेल्या आठवड्याभरापासून पुण्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनामुळे पुण्यात पूर्ण कोंडी होत आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलाने केला आहे.

शाळा, कॉलेजात जा

यावर कोर्टाने विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. हे प्रकरण आता कोर्टासमोर आहे. विद्यार्थ्यानी आंदोलन मागे घेऊन त्यांनी आपापल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. तुमच्या शाळा कॉलेज आणि इतर संस्थांमध्ये परत जा, अशी विनंती हायकोर्टाने विद्यार्थ्यांना केली आहे. यावेळी कोर्टाने सुनावणीवेळी दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांना आपआपल्या क्लासमध्ये परत जाण्यास सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आड कोणी असायला नको, असंही कोर्टाने म्हटलं.

आंदोलनाला परवानगी नाही

यावेळी सरकारी वकिलांनीही आपलं म्हणणं मांडलं. पुण्यातील लोकसंख्या 70 लाख आहे. आंदोलनाच्या ठिकाणी रोज नेते येतात आणि त्यामुळे रस्ते ब्लॉक होत आहेत. याचा सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे. या आंदोलनाला सध्या कोणीतीही परवानगी नाहीये, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टाला दिली. तसेच योग्य निर्णय घेण्यासाठी काम सुरू आहे. राज्यपालांना शिफारस केलेली आहे, असंही त्यांनी कोर्टाला सांगितलं. दरम्यान, कोर्टाच्या सुनावणीनंतर आता विद्यार्थी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आंदोलन संपणार की चालूच राहणार याकडे हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Follow Us
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...