AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिंवडीत चहाच्या टपरीवर तुफान राडा, ७ ते ८ जण जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद

Bhiwandi Tea Stall Clash: भिवंडीत दोन गटात जोरदार राडा झाला. दोन्ही गटाकडून एकमेकांना मारहाण करण्यात आली. यामध्ये ७ ते ८ जण जखमी झाले. पार्किंगच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे.

भिंवडीत चहाच्या टपरीवर तुफान राडा, ७ ते ८ जण जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद
भिंवडीत चहाच्या टपरीवर तुफान राडा, ७ ते ८ जण जखमी
| Updated on: Oct 24, 2026 | 9:09 AM
Share

Bhiwandi Tea Stall Clash: भिंवडीत चहाच्या टपरीवर दोन गट आपआपसात भिडले. त्यात ७ ते ८ जण जखमी झाले आहेत. भिवंडीतील चाविंद्रा परिसरात मोटारसायकल पार्किंगच्या वादातून हॉटेल मालक आणि ग्राहकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

काठ्या, रॉड, कुकरचा सर्रास वापर

भिंवडीत चहाच्या टपरीवर दोन गटात जोरदार मारहाण झाली. चाविंद्रा परिसरात मोटारसायकल पार्किंगच्या वादातून हॉटेल मालक आणि ग्राहकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात लाकडी काठी, लोखंडी रॉड, कुकर आणि फावड्याचा वापर करून मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत ७ ते ८ जण जखमी झाले असून हाणामारीदरम्यान चहाच्या हॉटेलची तोडफोड करण्यात आली. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

जळगाव तालुक्यातील दापोरा येथे दोन गटांत सशस्त्र हाणामारी

जुन्या भांडणाच्या कारणावरून दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत चॉपर-चाकूचा वापर करत हाणामारी करण्यात आली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात दोन्ही गटांच्या तक्रारीवरून परस्परविरोधी आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दोन्ही गटांकडून चाकू, चॉपरचा वापर करण्यात आला. तसेच परस्पर विरोधी तक्रारीही पोलिसांत दाखल करण्यात आल्या आहेत. दोन्ही गटाच्या या हाणामारीमध्ये काहीजण जखमी झाले असल्याची देखील माहिती मिळाली आहे

बावधनमध्ये अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला

पुण्यातील बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महाळुंगे गावात अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. शाळेच्या सहलीदरम्यान मुलींच्या डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पाठवल्याने वाद झाला होता. याच वादातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…