अभिजीत दीपकेंकडून PM मोदींचा वाढदिवस साजरा; दिवा पेटवला, नंतर काय गिफ्ट पाठवलं?
अभिजीत दीपकेंकडून PM मोदींचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर दिवा पेटवून मोदींना गिफ्ट पाठवलं. जाणून घ्या दीपके मोदींना काय म्हणाले...

कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी सरकारी शाळेच्या दुरावस्थेवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर करत अभिजीत दीपकेंनी टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये अभिजीत दीपके यांनी एक दिवा पेटवला, त्यानंतर मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या व्हिडिओदरम्यान दीपकेंनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे.
दीपके म्हणाले, ‘आम्ही शाळेची इमारत तुम्हाला गिफ्ट देत आहोत. ही 12 वर्षातील तुमच्या कामाची पोचपावती आहे. त्यानंतर दीपकेंनी शाळेच्या इमारतीची दुरावस्था दाखवली. पुढे दीपके म्हणाले, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी. आम्ही तुम्हाला भेट म्हणून ही सरकारी शाळा देत आहोत’. मागील काही दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टीने देशभरात ‘स्कूल ठीक करो’ अभियान सुरू केलं आहे. मागील महिन्याभरापासून अभिजीत दीपके आणि इतर विद्यार्थी नेत्यांनी सरकारी शाळांना भेटी दिल्या. या सर्व नेत्यांनी शाळेची दुरावस्था दाखवली. तर याच आठवड्यात दीपकेंनी एका नव्या आंदोलनाची देखील घोषणा केली. या आंदोलनाला त्यांनी ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ असे अभियानाला नाव दिले आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या दाव्यानुसार, देशभरातली अनेक आदिवासी शाळेची स्थिती खराब आहे. या शाळांमध्ये मूलभूत सुविधा देखील नाहीत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 8 दशकानंतरही आदिवासी विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांकडे डोळेझाक केली जात आहे. आतापर्यंत या अभियानातून सरकारवर निशाणा साधण्यात आलेला नव्हता. परंतु आता दीपकेंनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारपासून देशातील विविध ठिकाणी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. त्यांच्या जन्मस्थळी वडनगर ते कर्मभूमी वाराणसीपर्यंत उत्सव साजरा केला जात आहे. वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर देशीतल विविध ठिकाणी आशीर्वाद दिवे पेटवण्यात आले. तसेच देशातील विविध नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. देशभरात हे अभियान महिनाभर सुरू राहणार आहे.
