Video : कारनंतर आता हेल्मेटमध्येही एअरबॅग, अपघात झाला की लगेच…नवी टेक्नोलॉजी पाहून थक्क व्हाल

बाईकस्वारांसाठी आता एक मोठी बातमी समोर आली आहे. जसं कारमध्ये अपघाताच्यावेळी एअरबॅग मिळतात आणि जीवितहानी टळते. त्याचप्रमाणे आता बाईकच्या हेल्मेटमध्येही एअरबॅग असणार आहेत, ज्यामुळे धोका टळणार आहे. त्या हेल्मेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे .

Video : कारनंतर आता हेल्मेटमध्येही एअरबॅग, अपघात झाला की लगेच...नवी टेक्नोलॉजी पाहून थक्क व्हाल
viral video of airbag helmate
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 2:46 PM

बाईक चालवताना अपघात झाला तर हेल्मेट डोक्याचं संरक्षण करतं. हे सगळ्यांनाच माहित आहे. पण समजा बाईकवरून पडताच तुमच्या हेल्मेटमधून एअरबॅग बाहेर आली आणि तिनं तुमच्या शरीराला कव्हर केलं तर? असं झालं तर किती बरं होईल ना? किती अपघात टळतील. चीनने अशाच एका हेल्मेटची निर्मिती केली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

Loading...

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बाईकस्वाराचा अपघात होतो आणि त्याच क्षणी एअरबॅग ओपन होते. ती एअरबॅग बाईकस्वाराच्या संपूर्ण शरीराला कव्हर करते. त्यामुळे मोठ्या अपघातापासून वाचण्यात त्याची मदत होते. कारमध्ये अपघाताच्या वेळी जशी एअरबॅग उघडते तसाच काहीसा प्रकार तंत्रज्ञान या हेल्मेटमध्ये असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ आणि ही सिस्टिम चीनची असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करताना चीनच्या दोन नामांकित कंपन्यांनी हे हेल्मेट तयार केल्याचा दावा केला जात आहे. मात्र या दोन्ही कंपन्यानी हेल्मेट निर्मितीची अधिकृत घोषणा केलेली नाही.

 

 

या व्हिडिओकडे बारकाईनं पाहिलं असता काही गोष्टी नेटकऱ्यांच्या नजरेत आल्या आहेत. बाईकस्वाराच्या हेल्मेटवर चीनमधील कंपनीचा लोगो नसून इटलीतील प्रसिद्ध एजीव्ही ब्रँडचा लोगो दिसतो. त्याचप्रमाणे बाईकस्वाराने घातलेल्या लेदर सूटवरही इटलीच्या डायनीज ब्रँडचा नाव दिसतं. त्यामुळे हा व्हिडिओ ai असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सध्या बाजारात एअरबॅग असलेले जॅकेट उपलब्ध आहे. अपघाताच्या वेळी त्यातील यंत्रणा सक्रिय होऊन शरीराभोवती एअरबॅग फुगते आणि छाती, पाठ, तसेच शरीराच्या महत्त्वाच्या भागाचं संरक्षण करते.

विशेष म्हणजे, 2022 मध्ये इटलीतील AIROH आणि स्वीडनमधील ऑटोलेटिव्ह या कंपन्यानी एअरबॅग तंत्रज्ञान असलेल्या हेल्मेटचा नमुना सादर केला होता. मात्र तो एक स्वतंत्र तांत्रिक प्रकल्प होता. सध्या व्हायरल होत असलेल्या चीनच्या नावाने पसरवलेल्या व्हिडिओशी त्याचा संबंध नाही

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us