अमेठीत तयार होणारी सर्वात घातक AK-203 रायफल कशी असेल?

लखनऊ:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील अमेठी इथं भारत-रशियाच्या शस्त्रास्त्र कारखान्याचं उद्घाटन करण्यात आलं. या फॅक्टरीत अत्याधुनिक AK-203 या रायफलची निर्मिती केली जाणार आहे. भारत आणि रशियाची कंपनी एकत्रित मिळून या रायफलची निर्मिती करणार आहे. या फॅक्टरीतून भारतासाठी तब्बल 7.50 लाख रायफल्स तयार केल्या जाणार आहेत. जगातली सर्वात आधुनिक अशी ही AK 203 …

अमेठीत तयार होणारी सर्वात घातक AK-203 रायफल कशी असेल?

लखनऊ:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील अमेठी इथं भारत-रशियाच्या शस्त्रास्त्र कारखान्याचं उद्घाटन करण्यात आलं. या फॅक्टरीत अत्याधुनिक AK-203 या रायफलची निर्मिती केली जाणार आहे. भारत आणि रशियाची कंपनी एकत्रित मिळून या रायफलची निर्मिती करणार आहे. या फॅक्टरीतून भारतासाठी तब्बल 7.50 लाख रायफल्स तयार केल्या जाणार आहेत. जगातली सर्वात आधुनिक अशी ही AK 203 रायफल आहे. त्यामुळे आता लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे.

AK सीरिजचं अपडेट व्हर्जन

AK-203 ही एके सीरिजची सर्वात अत्याधुनिक अपडेट रायफल आहे. याआधीचं AK-47 हे सर्वात जबरदस्त मॉडेल म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर AK- 74, AK- 56, AK- 100 आणि AK- 200 या रायफल्स आल्या होत्या. आता त्याच्या पुढचं व्हर्जन AK-203 भारताच्या ताफ्यात दाखल होणार आहे. AK-203 रायफलमध्ये ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक दोन्ही प्रकार उपलब्ध असतील.  महत्त्वाचं म्हणजे हायटेक असलेल्या AK-203 रायफलमधून एका मिनिटात 600 गोळ्या झाडल्या जाऊ शकतात. 400 मीटर अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता या अत्याधुनिक रायफलमध्ये आहे.

सर्व दलांना नव्या बंदुका

सीमारेषेवर सातत्याने पाकिस्तानकडून गोळीबार सुरु असतो. शिवाय दहशतवाद्यांकडूनही सतत हल्ले होत असतात. त्यामुळे भारताच्या संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्यांना अद्याधुनिक शस्त्र देण्याचा निर्णय घेतला. AK-203 या रायफल्स आधी तीनही दलांच्या जवानांना देण्यात येतील. त्यानंतर अर्धसैनिक दल आणि राज्यांच्या पोलिसांनाही या रायफल्स पुरवल्या जातील.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *