AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर-दक्षिण वादामुळे देश विभागू देणार नाही, अमित शहांनी संभ्रम पसरवणाऱ्या विरोधकांना सुनावलं

Amit Shah : अमित शाह यांनी म्हटले की, विरोधक महिला आरक्षण विधेयकाबाबत विरोधक भ्रम निर्माण करत आहेत. उत्तर-दक्षिण असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, मात्र आम्ही देशाचे विभाजन होऊ देणार नाही.

उत्तर-दक्षिण वादामुळे देश विभागू देणार नाही, अमित शहांनी संभ्रम पसरवणाऱ्या विरोधकांना सुनावलं
Amit Shah oppositionImage Credit source: Google
| Updated on: Apr 17, 2026 | 9:32 PM
Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करताना सरकारची भूमिका स्पष्ट केली. शहा यांनी सांगितले की, देशात असे 127 मतदारसंघ आहेत जिथे 20 लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. परिसीमन झाल्यानंतर मतांचे मूल्य समान होईल. याचबरोबर त्यांनी विरोधकांवरही टीका केली आणि म्हटले की महिला आरक्षण विधेयकाबाबत विरोधक भ्रम निर्माण करत आहेत. उत्तर-दक्षिण असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, मात्र आम्ही देशाचे विभाजन होऊ देणार नाही.

या विधेयकावर चर्चा करताना शहा म्हणाले की, मतदार-प्रति-खासदार प्रमाण संतुलित करण्यासाठी आणि लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी मतदारसंघांचे परिसीमन आवश्यक आहे. काही ठिकाणी एका मतदारसंघात 45 लाख मतदार आहेत, तर काही ठिकाणी फक्त 6 लाख मतदार आहेत. त्यामुळे विविध मतदारसंघांमध्ये प्रत्येक मताचे मूल्य समान राहत नाही. त्यामुळे पुनर्रचना करणे आवश्यक आहे.

शाह यांनी इंदिरा गांधी सरकारचा उल्लेख केला

अमित शाह यांना अनेक सदस्यांनी विचारले की, परिसीमन आता का आणले जात आहे? त्यावर त्यांनी स्पष्ट केले की नारी शक्ती वंदन अधिनियममध्ये नमूद आहे की 2026 नंतर होणाऱ्या जनगणनेनंतर होणाऱ्या परिसीमन प्रक्रियेत महिलांसाठी आरक्षण लागू केले जाईल. काहीजण विचारतात की हा उल्लेख विधेयकात का केला गेला? पण हे आम्ही केलेले नाही. 1971 मध्ये इंदिरा गांधी यांच्या सरकारने मतदारसंघांची संख्या फ्रीज केली होती. त्या आधारावरच आता महिला आरक्षण लागू केले जाणार आहे. सरकारचे उद्दिष्ट 2029 पर्यंत महिला आरक्षण पूर्णपणे लागू करण्याचे आहे, जेणेकरून महिलांना राजकारणात अधिक संधी मिळतील.

इंडी आघाडीवर शाह यांची टीका

अमित शाह यांनी म्हटले की, हा विषय समजून घेतला तर महिला आरक्षणासाठीच्या संविधान दुरुस्तीला कोणीही विरोध करणार नाही. बहुतेक सदस्यांनी या दुरुस्तीचे स्वागत केले आहे. मात्र इंडी आघाडीतील सर्व सदस्यांनी स्पष्टपणे महिला आरक्षणाला विरोध केला आहे, असा आरोप यावेळी शाह यांनी केला.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!