AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अम्मा प्रेग्नंट है… 23 वर्षांच्या लेकीला बापाचा फोन, 47 व्या वर्षी आई गर्भवती, मुलीची भावनिक पोस्ट व्हायरल!

Amma Pregnant Hai... तरुण वयातल्या मुलीला हे सांगणाऱ्या बापाचं मन.. त्याचे शब्द ऐकल्यावर मुलीची प्रतिक्रिया, घरात उठणारं भावनिक वादळ... नकारात्मकतेने घेतलं तर ही वावटळ घर उध्वस्त करू शकते अन् सकारात्मकतेनं घेतली तर आयुष्याचा आनंदोत्सव. परिस्थितीकडे बघण्याची आपली नजर खूप महत्त्वाची असते, हे सांगणारी ही बातमी!

अम्मा प्रेग्नंट है... 23 वर्षांच्या लेकीला बापाचा फोन, 47 व्या वर्षी आई गर्भवती, मुलीची भावनिक पोस्ट व्हायरल!
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 16, 2023 | 5:16 PM
Share

नवी दिल्ली | 23 वर्षांच्या लेकीला बाबांचा फोन येतो. मुलगी बंगळुरूत (Bengluru) शिकायला. आई-बाबा केरळमध्ये (Kerala). तिकडे बापाच्या मनात कसलं विचारांचं काहूर माजलं असेल, कल्पनाही करवत नाही. विषयच तसा होता. 23 वर्षांच्या लेकीला बाप गूड न्यूज देणार होता. कित्येक दिवसांपासून त्याला सांगायचं होतं. पण आईचं वय, लेकीचं वय, समाजाच्या नजरा, टोमणे या सगळ्या दडपणामुळं त्याची हिंमत होत नव्हती. अखेर त्यानं 3 च शब्दात सांगितलं. अम्मा प्रेग्नंट है.. (Amma Pregnant Hai) लग्नाच्या वयात आलेल्या या लेकीला धक्का बसणार हे साहजिकच आहे. पण ती ज्या धीरानं या प्रसंगाला सामोरं गेली,ते इथे जास्त महत्त्वाचं आहे. आई-बाबांमधलं नातं, आईचं गर्भवती असणं, तरुण वयातली लेक जेव्हा आईच्या बाळंतपणासाठी येते, या दोघींमध्ये झालेली भावनांची देवाण-घेवाण या सगळ्यांबद्दल या लेकीने अत्यंत स्पष्ट आणि मनमोकळी पोस्ट लिहिलीय. सोशल मिडियावर या लेकीची पोस्ट प्रचंड व्हायरल होतेय.

लेकीची मॅच्युरिटी पहा…

Humans od Bombay या अकाउंटवर ही पोस्ट इस्टाग्रामवर शेअर कऱण्यात आली आहे. यात लेकीने हा सगळा प्रसंग लिहिलाय. तिने लिहिलेल्या पोस्टचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे-

लहानपणापासून मी माझ्या आईकडे नेहमी हट्ट धरला. मला छोटा भाऊ किंवा बहीण हवी आहे. पण आई सांगायची. माझ्या जन्मानंतर तिच्या गर्भाशयाला इजा झाली. त्यामुळे आमच्या घरात कधीही लहान बाळ येऊ शकत नाही. आईला कधीही गर्भधारणा होऊ शकणार नव्हती. मोठं झाल्यावर मी ते स्वीकारलं. वर्ष पुढे जात राहिली.

नुकतीच मी बंगळुरूत कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आलेय. अम्मा आणि अप्पा केरळमध्येच राहतात. अप्पांचा तो फोन येईपर्यंत सगळं सुरळीत होतं. त्या दिवशी अप्पांचा फोन आला. त्यांनी मला ती गोष्ट सांगितली. मी कशी प्रतिक्रिया देईन याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. पण त्या फोननंतर काही दिवसात मी घरी केरळला पोहोचले. धावतच आईच्या कुशीत शिरले आणि धाय मोकलून रडू लागले. मला का लाज वाटेल? कित्ती दिवसांपासून मला हेच हवं होतं…

त्या दिवसानंतर अम्मा आणि मी खूप वेळ एकत्र घालवू लागलो. घरी गेल्यावर मला सगळा खुलासा झाला. अम्मा आणि अप्पा एक दिवस मंदिरात गेल्यावर अम्मा चक्कर येऊन पडली. खूप अशक्तपणा आला होता. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं ती प्रेग्नंट आहे. काही कारणांमुळे तिचं पोट दिसत नव्हतं. अम्माची मासिक पाळी थांबली होती. पण तिला वाटलं मेनोपॉज आला. अनेक महिने गॅप पडल्यामुळे प्रेग्नंट राहूत, अशी कल्पनाही तिच्या मनाला शिवली नव्हती.

हळू हळू आम्ही कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींना हे सांगायला सुरुवात केली. काहींनी आपुलकीनं चौकशी केली. काहींनी टोमणे मारले. पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. अम्माचं बाळंतपण चांगलं झालं. घरात कुठेही तणावाचं वातावरण नव्हतं.

एक आठवडा झालाय. आईने मुलीला जन्म दिलाय. आयुष्यात आणखी काय हवं. ती कधी एकदा मला दीदी म्हणेल.. माझे कान आसुसलेत. मला माहितीय. लोकांना हे विचित्र वाटेल. आमच्या वयात खूप फरक आहे. पण हे तितकं महत्त्वाचं आहे का? हे खूप गमतीशीर आहे. एवढी वर्ष आम्हाला माहितही नव्हतं..ती आमच्या घरी येतेय. आमच्या आयुष्यात येतेय… आता ती आलीय. त्यामुळे तिच्यापासून दूर जाण्याची अजिबात इच्छा नाही…

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा