AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ घोंघावतंय, पुन्हा भूकंप की सरकारमध्ये स्थिरता? जस्टिस शाह यांच्या रिटायर्मेंटआधी….

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात वादळ घोंघावणार की सरकार स्थिर होणार? याबाबतची स्पष्टता आता लवकरच जाहीर होणार आहे. जस्टिस शाह यांच्या निवृत्तीआधी हे सगळं चित्र समोर येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ घोंघावतंय, पुन्हा भूकंप की सरकारमध्ये स्थिरता? जस्टिस शाह यांच्या रिटायर्मेंटआधी....
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 16, 2023 | 5:27 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी (Maharashtra Political Crisis) आता संपलेली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता कुणीही युक्तिवाद करणार नाही. महाराष्ट्राने गेल्या दहा महिन्यांमध्ये बरेच राजकीय भूकंप पाहिले. सत्तांतर पाहिलं आणि भांडणंही पाहिली. महाराष्ट्रातील सरकार आजही पूर्णपणे स्थिर आहे, असं म्हणता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल जर ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर महाराष्ट्रात कदाचित मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचं या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अखेर नऊ महिन्यांनी ही सुनावणी संपली आहे. आणि आता लवकरच निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा निकाल आज जाहीर झाला नाही. सुप्रीम कोर्टात आज सुनावणी संपली. पण निकाल जाहीर झाला नाही. सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे आता हा निकाल नेमका कधी लागेल? असा प्रश्न अनेकांच्या मनात सतावतोय. अर्थात निकाल हा लवकरच लागेल. पण सुप्रीम कोर्टाने तारीख जाहीर केलेली नसल्याने जनतेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या दरम्यान हा निकाल कधी लागू शकतो याबद्दल काही शक्यता वर्तवण्यात येत आहे. या शक्यतांपैकी एक महत्त्वाची शक्यता म्हणजे जस्टिस एमआर शाह यांच्या निवृत्तीच्या आधी निकाल जाहीर होऊ शकतो.

निकाल नेमका कधी लागणार?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठात जस्टिस एमआर शाह यांचा समावेश होता. त्यामुळे शाह यांच्या निवृत्तीआधी या सुनावणीचा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. तशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. जस्टिश शाह हे येत्या 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे निकाल हा 15 मे च्या आधी येण्याची दाट शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टात अंतिम क्षणी काय-काय घडलं?

सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूने युक्तिवाद संपल्यानंतर आज घडलेल्या घडामोडी देखील महत्त्वाच्या आहेत. सुनावणीचा शेवट अतिशय रंजक झाला. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी या युक्तिवादाचा शेवट केला. त्यांनी शेवटच्या क्षणी संस्कृतमध्ये सुभाषित म्हणून युक्तिवादाचा शेवट केला. खरी शिवसेना कुणाची त्याचा निर्णय न्यायालय घेईल, असं म्हणत त्यांनी भावनिकपणे अपेक्षा व्यक्त केल्या.

ठाकरे गटाच्या बाजून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, देवदत्त कामत आणि अभिषेत मनुसिंघवी या तीनही वकिलांनी युक्तिवाद केला. ज्यांची याचिका दाखल असते त्याच पक्षाला शेवटच्या क्षणी कोर्टात रिजॉईंडर करण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे ठाकरे गटाच्या वकिलांना ती संधी मिळाली. दोन्ही बाजूच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. तब्बल नऊ महिन्यांनी या सुनावणीचा अंत झाला. आता फक्त निकालाची प्रतिक्षा आहे. निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे.

ठाकरे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

सुप्रीम कोर्टात आज ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आजचा आणि कालचा दिवस अतिशय महत्त्वाचे होते. शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर ठाकरे गटाच्या वकिलांनी देखील जोरदार युक्तिवाद केला. विशेष म्हणजे राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीसाठी निमंत्रण देण्याची कृती ही सरकार पाडण्याला कारणीभूत ठरव्याचं म्हणत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केलेली. त्यानंतर आज ठाकरे गटाच्या वकिलांनी पुन्हा राज्यपालांच्या मुद्द्यावरुन जोरदार युक्तिवाद केला.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.