महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! सुप्रीम कोर्टातली सुनावणी संपली! आता निकाल…

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर नऊ महिन्यांनी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. आता कोर्ट काय निकाल देतं? याकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि जगाचं लक्ष लागून राहणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! सुप्रीम कोर्टातली सुनावणी संपली! आता निकाल...
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 4:47 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर नऊ महिन्यांनी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. आता सुप्रीम कोर्ट (Supreme Court) काय निकाल देतं? याकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि जगाचं लक्ष लागून राहणार आहे. कोर्टात आज दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. कोर्टाने निकाल राखून ठेवला असल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने आज लगेच निकाल जाहीर केलेला नाही. पण हा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या गोष्टीची उत्कंठा शिगेला पोहोचली होती, ती गोष्ट आता लवकरच स्पष्ट होणार आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या (MLA Disqualification) मुद्द्यावर आता निकाल लागणार आहे. शिवसेना नेमकी कुणाची खरी? कुणाची बाजू एकदम खरी? कोण खरं आणि कोण खोटं? कुणाच्या वकिलांनी अतिशय योग्य युक्तिवाद केला ते आता लवकरच स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबतची सर्व सुनावणी पूर्ण झालीय. आता कुणीही युक्तिवाद करणार नाही. सुप्रीम कोर्टाने निकाल देखील राखून ठेवला आहे. निकाल कधी लागेल त्याबाबतची माहिती लवकरच समजेल. पण सुनावणीचा शेवट अतिशय रंजक झाला. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी या युक्तिवादाचा शेवट केला. त्यांनी शेवटच्या क्षणी संस्कृतमध्ये सुभाषित म्हणून युक्तिवादाचा शेवट केला. खरी शिवसेना कुणाची त्याचा निर्णय न्यायालय घेईल, असं म्हणत त्यांनी भावनिकपणे अपेक्षा व्यक्त केल्या.

ठाकरे गटाच्या बाजून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, देवदत्त कामत आणि अभिषेत मनुसिंघवी या तीनही वकिलांनी युक्तिवाद केला. ज्यांची याचिका दाखल असते त्याच पक्षाला शेवटच्या क्षणी कोर्टात रिजॉईंडर करण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे ठाकरे गटाच्या वकिलांना ती संधी मिळाली.

हे सुद्धा वाचा

जस्टिस शाह हे येत्या 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत. घटनापीठात त्यांचा समावेश होता. त्यामुळे ते निवृत्त होण्याआधी याबाबतचा निकाल जाहीर होणं अपेक्षित आहे. दरम्यान, दोन्ही बाजूच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. तब्बल नऊ महिन्यांनी या सुनावणीचा अंत झाला. आता फक्त निकालाची प्रतिक्षा आहे. निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे.

ठाकरे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

सुप्रीम कोर्टात आज ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आजचा आणि कालचा दिवस अतिशय महत्त्वाचे होते. शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर ठाकरे गटाच्या वकिलांनी देखील जोरदार युक्तिवाद केला. विशेष म्हणजे राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीसाठी निमंत्रण देण्याची कृती ही सरकार पाडण्याला कारणीभूत ठरव्याचं म्हणत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केलेली. त्यानंतर आज ठाकरे गटाच्या वकिलांनी पुन्हा राज्यपालांच्या मुद्द्यावरुन जोरदार युक्तिवाद केला.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.