AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IndiGo flight engine failure: इंडिगोच्या फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड, अचानक इंजिन फेल, पायलटच्या एका निर्णयमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

IndiGo flight engine failure: इंडिगोची फ्लाइट आज सकाळी गोव्याहून दिल्लीसाठी निघाली होती. काहीच वेळात विमानाचे इंजिन फेल झाले. त्यानंतर पायलटने मोठा निर्णय घेतला. आता नेमकं काय घडलं होतं? वाचा...

IndiGo flight engine failure: इंडिगोच्या फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड, अचानक इंजिन फेल, पायलटच्या एका निर्णयमुळे वाचले प्रवाशांचे प्राण
indigo flightImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 01, 2026 | 12:46 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून देशातील विमान अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहेत. कुठे विमानामध्ये बिघाड होत आहे तर कुठे विमान वेगळ्याच विमानतळावर लँड होताना दिसत आहे. नुकताच गोव्याहून दिल्ली जात असलेल्या इंडिगोच्या फ्लाइटचे इंजिन खराब झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइट क्रमांक ६ई २१०२ मंगळवारी सकाळी गोव्याहून दिल्लीसाठी निघाली होती. थोड्या वेळानेच एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याची सूचना मिळाली. त्यानंतर वैमानिकाने मोठा निर्णय घेतला आणि सर्व प्रवाशांना सुखरुप पोहोचवले.

नेमकं काय घडलं?

सूत्रांच्या मते, ६ई २१०२ हे फ्लाईट सकाळी गोव्याहून दिल्लील निघाली होती. पण अचानक एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे विमान परत गोव्याला पाठवण्यात आले आणि मोपा विमानतळावर त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. सुमारे सकाळी ९:३० वाजता एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ने संपूर्ण आपत्कालीन स्थिती जाहीर केली होती. विमान सकाळी ९:५१ वाजता रनवे २८ वर सुरक्षित उतरले गेले आणि स्टँड ६ वर पार्क झाले. एटीसीने १०:०३ वाजता आपत्कालीन स्थिती संपवली.

फ्लाइट सकाळी ११:४५ वाजता दिल्लीला पोहोचणार होते

सर्व प्रवासी सुरक्षित उतरले आणि त्यांना बोर्डिंग एरियात बसवण्यात आले. फ्लाइटराडार २४ नुसार, विमान दक्षिणी महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून परत येत होते आणि विमानतळाकडे वळताना सुमारे १४,००० फूट उंचीवर होते.

ही फ्लाइट आधी सकाळी ११:४५ वाजता दिल्लीला पोहोचणार होती, पण आता दुपारी ३:३० वाजतासाठी पुन्हा निश्चित करण्यात आली आहे. इंजिनमध्ये नक्की काय बिघाड झाला, याबाबत अजून अधिक माहिती समोर आलेली नाही.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा