AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्याचे नशीब उजळलं, खंदक खोदताना सापडले घबाड, सोन्याच्या नाण्यांचा खजाना पाहून डोळे चमकले..

जनावरांना रोखण्यासाठी खंदक खणताना शेतकऱ्यांना चक्क गुप्त खजानाच सापडला आहे. या खजाना अत्यंत पुरातन असल्याचे म्हटले जात आहे.

शेतकऱ्याचे नशीब उजळलं, खंदक खोदताना सापडले घबाड, सोन्याच्या नाण्यांचा खजाना पाहून डोळे चमकले..
Ancient gold coins were found
| Updated on: Sep 06, 2026 | 11:20 PM
Share

कर्नाटकातील एका गावातील एका शेतकऱ्याला जनावरांसाठी खंदक खोदताना अचानक मोठा खजाना सापडल्याची घटना घडली आहे. या खंदकात चक्क सोन्याची नाणी सापडल्याने खंदक खोदणाऱ्यांचे डोळे चमकले. ही सोन्याची नाणी नेमकी कोणत्या काळातील आहेत याचा शोध घेतला जात आहे.

कर्नाटकाच्या बेळगाव जिल्ह्यातील इंचल गावातील बीसीएम (BCM) वसतिगृहाजवळ ‘व्हीबी जी आरएएम जी’ (VB G RAM G) योजनेअंतर्गत काम करणाऱ्या चार जॉब कार्डधारकांना २९ ऑगस्ट रोजी जनावरांना रोखण्यासाठी खंदक खोदताना चक्क सोन्याची नाणी सापडल्याची घटना घडली आहे, ही सोन्याची नाणी ५४.८८ ग्रॅम वजनाची असून एकूण १४ सोन्याची प्राचीन नाणी सापडली आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील इंचल गावातील बीसीएम (BCM) वसतिगृहाजवळ ‘व्हीबी जी आरएएम जी’ (VB G RAM G) योजनेअंतर्गत काम करणाऱ्या चार जॉब कार्डधारकांना २९ ऑगस्ट रोजी जनावरांना रोखण्यासाठी खंदक खोदताना ५४.८८ ग्रॅम वजनाची १४ प्राचीन सोन्याची नाणी सापडली.

रस्ते योजनेचे काम करणारे कामगार अप्पाण्णा तलवार, यल्लाप्पा कारीगर,केंचप्पा बंदगी आणि भीमण्णा तलवार यांना ही खंदक खणताना चमकणारी वस्तू सापडली. त्यांनी माती नीट साफ केली तेव्हा ही सोन्याची नाणी असल्याचे लक्षात त्यांच्या त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मात्र, हे गुप्तधन रस्त्यावरील मैदानात सापडल्याने हे सोने सरकारी जमा करावे लागणार असल्याने कळताच त्यांच्या आशेवर पाणी फेरले.

४ सप्टेंबर रोजी ही नाणी सरकारी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. ही नाणी सरकारी तिजोरीत जमा करण्यात आली असून, तज्ज्ञ आणि इतिहास कार या सोन्याच्या नाण्यांची कार्बन टेस्ट करुन ती कोणत्या काळातील आहेत याचा अभ्यास करत आहेत. त्याबाबतची माहिती त्यानंतरच मिळेल असे म्हटले जात आहे.या १४ सोन्याच्या प्रत्येक नाण्यांचे वजन सुमारे ३.९१ ग्रॅम इतके आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली