भाजपला मोठा झटका! ‘सिंघम’ नेता नवा पक्ष काढणार; काय आहे मोठा राजकीय डाव?

भाजपला मोठा धक्का देत माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी तामिळनाडूत नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. 'वुई दी लीडर्स' आंदोलनाद्वारे ते सामाजिक कार्य करत होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठे बदल अपेक्षित असून भाजपच्या विस्ताराच्या आशांना खीळ बसू शकते.

भाजपला मोठा झटका! ‘सिंघम’ नेता नवा पक्ष काढणार; काय आहे मोठा राजकीय डाव?
PM Modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2026 | 2:06 PM

भाजपला झटका दिल्यानंतर आता एक बडा नेता नवीन पक्ष स्थापन करणार आहे. के. अन्नामलाई असं या नेत्याचं नाव आहे. अन्नामलाई हे तामिळनाडूत भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पद आणि पक्ष सोडला होता. त्यावेळीच त्यांनी नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आता अन्नामलाई नवीन पक्ष स्थापन करत आहेत. अन्नामलाई यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत भाजपचं वर्चस्व नाहीये. भाजपला या राज्यात वर्चस्व निर्माण करायचं होतं. अन्नामलाई यांच्यामुळे भाजपच्या या स्वप्नांना खिंडार पडण्याची शक्यता आहे.

पलानी येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अन्नामलाई यांना पत्रकारांनी घेरून प्रश्नांचा भडिमार केला. त्यावर त्यांनी आपण लवकरच राजकीय पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली. अन्नामलाई यानी ‘वुई दी लीडर्स’ नावाचं एक नवीन आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी राज्यात अनेक जनकल्याणकारी आणि सामाजिक कामे हाती घेतली आहेत. त्यांची एक टीम नशाबंदीवर काम करत आहेत. लोकांमध्ये जागृती निर्माम करत आहे. तर दुसरी टीम पर्यावरण संरक्षणावर काम करत आहे.

Loading...

निवडणूक लढवणार

दरम्यान, अन्नामलाई यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केल्याने तामिळनाडूच्या राजकारणात नवीन समीकरणे उदयाला येण्याची चिन्हे दिसत आहे. ‘वुई द लीडर्स’ या आंदोलनाच्या माध्यमातून ते महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मैदानात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

आयपीएसची नोकरी सोडून

अन्नामलाई यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक आहे. अन्नामलाई हे राजकारणात येण्यापूर्वी प्रशासकीय सेवेत कार्यरत होते. ते 2011च्या कर्नाटक कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. अत्यंत कडक आणि कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांचा लौकीक होता. त्यांना ‘कर्नाटकचा सिंघम’ म्हटलं जायचं. 2019मध्ये त्यांनी आयपीएस पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये सामील झाले होते. पुढे त्यांना तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं होतं. त्यांच्या नेतृत्वात पक्षाने तामिळनाडूत मोठ्या प्रमाणावर जनाधार वाढवला होता. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे अन्नामलाई फिरत होते. पण पक्षांतर्गत नाराजीमुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता नवीन पक्ष स्थापन करून दुसरी राजकीय इनिंग खेळणाऱ्या अन्नामलाईंचा हा डाव कसा असेल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us