अभिजीत दिपके बाजूला अरविंद केजरीवाल यांची मोठी खेळी, पंतप्रधानांच्या निवासस्थानी..

कॉकरोच जनता पार्टीने देशभरात मोठे आंदोलन उभारले. या आंदोनला प्रतिसाद प्रचंड भेटला. जंतर मंतवर लोक पोहोचलेच शिवाय देशातील विविध शहरांमध्ये नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात विद्यार्ती रस्त्यावर उतरले.

अभिजीत दिपके बाजूला अरविंद केजरीवाल यांची मोठी खेळी, पंतप्रधानांच्या निवासस्थानी..
Abhijit Dipke and Arvind Kejriwal
| Updated on: Aug 03, 2026 | 11:57 AM

दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेले आंदोलन देशभरात चर्चेत राहिले. विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यातून दिल्लीत दाखल झाले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. या आंदोलनाने सरकारला मोठा झटका दिला. मोदी सरकारमधील हा पहिला राजीनामा ठरला. कॉकरोच जनता पार्टीला देशभरातून मिळालेला प्रतिसाद पाहता. आता कॉकरोच जनता पार्टीला बाजूला सारून आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला. E-20 इंधनाचा मोठा मुद्दा करून सरकारविरोधात जनआंदोलन अरविंद केजरीवाल यांच्याकडून उभे केले जातंय. हा त्यांचा रणनीतीचाच एक भाग असल्याचेही बोलले जात आहे.

अरविंद केजरीवाल यांनी E20 इंधनाच्या विरोधात सरकारविरोधात मोठा मोर्चा उघडला आहे. त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. दोन लाखांहून अधिक लोकंकडून त्यांनी ऑनलाईन याचिकेवर सह्या घेतल्या, तसा दावा त्यांनी केला. 4 ऑगस्ट रोजी ते आपल्यासोबत 100 समर्थकांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर मोर्चा काढणार आहेत. हेच नाही तर यादरम्यान त्यांनी लाठीमार आणि तुरुंगवासाची भीती न बाळगणारेच त्यांच्यासोबत येतील, असेही त्यांनी म्हटले.

केजरीवाल यांची ही घोषणा अशा वेळी आली आहे, जेव्हा नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावेळी आंदोलनाचे नेतृत्व अभिजीत दिपके यांनी केले होते.  सरकारने कॉकरोच जनता पार्टीच्या जवळपास मागण्या मान्य केल्या. आता सरकारविरोधात आम आदमी पार्टीनेही E20 इंधनाचा विषय धरून ठेवला आहे. मात्र, त्यामध्ये त्यांनी मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टीला घेतला नाही.

कारण या आंदोलनाचे श्रेय त्यांना जाऊ शकते. जसे कॉकरोच जनता पार्टीला लोकांचे समर्थन मिळाले, तसे आपल्यालाही मिळेल, अशी आशा अरविंद यांना आहे. या मोर्चाच्या माध्यमातून देशाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मोठी खेळी खेळली. त्यांनी याकरिताच थेट नरेंद्र मोदी यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us