AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेतील शिक्षणावर कोणी केला खर्च, अभिजीत दिपके यांचा मोठा खुलासा, म्हणाले, मी..

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके चर्चेत आहेत. अभिजीत दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चाैकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे. पहिल्यांदाच आपल्या विदेशातील शिक्षणातील खर्चावर बोलताना अभिजीत दिपके दिसले.

अमेरिकेतील शिक्षणावर कोणी केला खर्च, अभिजीत दिपके यांचा मोठा खुलासा, म्हणाले, मी..
Abhijeet Dipke
| Updated on: Aug 03, 2026 | 11:03 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. जंतर मंतरवर अभिजीत दिपकेंनी मोठे आंदोलन केले. थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यानंतर अभिजीत दिपकेची देशभरात चर्चा होत होती. अमेरिकेतून भारतात दाखल होत अभिजीत दिपकेंने मोठे आंदोलन पुकारले. पहिल्या प्रयत्नात अभिजीत दिपके यांना अपयश मिळाले. पण दुसरे आंदोलन देशभरात पोहोचले. अभिजीत दिपके यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची चौकशी करण्याची मागणी एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्यांने केल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. अभिजीत दिपकेंच्या वडिलांकडे अभिजीतला अमेरिकेत पाठवण्यासाठी पैसा कुठून आला याची चाैकशी करणारे पत्र देण्यात आले.

अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधून अभिजीत दिपकेंनी शिक्षण घेतले. नुकताच अभिजीत दिपके यांनी परदेशातील उच्च शिक्षणाचा खर्च कुटुंबाच्या कोणत्याही अघोषित  मालमत्तेतून करण्यात आल्याचा आरोप फेटाळला आहे. अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले की, त्यांनी त्यांच्या विदेशातील शिक्षणाचा खर्च नक्की कसा केला आणि कोणी केला. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, माझ्या शिक्षणाचा खर्च बोस्टन युनिव्हर्सिटीच्या शिष्यवृत्तीतून भागवला गेला.

यासोबतच मी शैक्षणिक कर्जही घेतले होते, ज्याची परतफेड मला आता करावी लागणार आहे. 60,000 ते 65,000 रुपये मासिक उत्पन्न असलेल्या एका सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला कसे पाठवले असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते अमित तिवारी यांनी उपस्थित केला. तसे एक पत्रही त्यांनी अभिजीत दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चाैकशी व्हावी, असे दिले.

या आधारावर त्यांनी त्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची चौकशी करण्याची मागणी केली. आता या आरोपींवरही अभिजीत दिपके स्पष्ट बोलले आहेत. अभिजीत दिपके यांच्यावर सतत गंभीर आरोप केली जात आहेत. यासोबतच कॉकरोच जनता पार्टीला आंदोलनासाठी विदेशातून मोठा पैसा पुरवला गेल्याचेही सांगितले जातंय. तसा आरोप होत आहे. मात्र, नक्की कॉकरोच जनता पार्टीला पैसा कोणी पुरवला याबाबत माहिती मिळू शकली नाही.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी