Asha Bhosle last rites LIVE : महाराष्ट्राचा सूर हरपला…, आशा ताईंवर आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
Asha Bhosle last rites LIVE Coverage and Updates in Marathi : लोकप्रिय गायिका आशा भोसले म्हणजेच आशा ताई यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्यावर दादर येथील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत... याबद्दल अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग

LIVE NEWS & UPDATES
-
आशा भोसलेंच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि मजेशीर अंदाज कधीच दूर झाला नाही – संजय राऊत
लतादीदी गेल्या, आता आशाताई गेल्या, पण त्यांच्या बाबतीत एका युगाचा अंत असं म्हणणं योग्य नाही. मंगेशकर कुटुंब हे महाराष्ट्राचा एक भाग आहे. ते कधीच दूर होणार नाही. त्यांनी आयुष्यात प्रचंड संघर्ष घेतला. पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि मजेशीर अंदाज कधीच दूर केला नाही, असे संजय राऊत म्हणाले
-
धाराशिवात शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नाराज शिवसैनिकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे ५० शिवसैनिकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते. या कारवाईमुळे पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे.आज हे सर्व कार्यकर्ते खासदार श्रीकांत शिंदे यांची सोलापूर येथे भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.
-
-
32 हजार किलो भेसळयुक्त मँगो पल्पचा साठा जप्त
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे आणि मावळ तालुक्यातील उरसे येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत भेसळयुक्त मँगो पल्पचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल 32 हजार किलोचा मँगो पल्पचा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
-
सोलापूरकरांसाठी आणखी एक वंदेभारत ट्रेन मिळणार
सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सोलापूरसाठी आणखी एक वंदेभारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहे. पुणे, मुंबईला जाण्यासाठी सोलापूरकरांना एक नवीन पर्याय मिळाला आहे. रेल्वे बोर्डाकडून नवीन स्लीपर कोच वंदे भारत एक्सप्रेसला मान्यता मिळाली आहे. – बंगळुरू ते मुंबई दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर मार्गे धावणार आहे.
-
प्राजक्त तनपुरेंची राहुरी पोटनिवडणुकीतून माघार
भाजपचे तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे २३ एप्रिल रोजी राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. आता निवडणुकीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली आहे. भाजप नेत्यांच्या भेटीनंतर प्राजक्त तनपुरे यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
-
-
नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरण
नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. कॉर्पोरेट जिहादप्रकरणी कंपनीतील ६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अटकेत असलेल्या ६ आरोपींवर IT कंपनीने कारवाई केली आहे. महिला कर्मचारी लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी आत्तापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-
उत्पादन घटल्याने बासमती तांदळाचे दर वाढण्याची शक्यता
पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्यातीत अडथळे येऊनही बासमती तांदळाची जागतिक मागणी कायम आहे. उत्पादनात सुमारे ८% घट आणि वाढते वाहतूक खर्च यामुळे दर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पंजाबसह उत्तर भारतातील उत्पादन घटले असताना निर्यात ६५ लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बाजारात दर वाढीचे संकेत दिसत आहेत.
-
-
आशा भोसले यांच्या अखेरच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था
आशा भोसले यांच्यावर आज म्हणजे 13 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात येतील. सांस्कृतिक आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आज आशाताईंच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे; चाहते येऊन श्रद्धांजली वाहू शकतात.”
-
जॅकी श्रॉफ आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दाखल
जॅकी श्रॉफ यांनीही आशा भोसले यांच्या घरी भेट दिली. त्यांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर, अभिनेत्याने तिथे पोहोचून दिवंगत गायिकेला श्रद्धांजली वाहिली.
-
आशा भोसले यांच्या निधनावर अभिनेता सनी देओल याने देखील केलं दुःख व्यक्त
आशा भोसले यांच्यासोबत एक फोटो पोस्ट करत अभिनेता म्हणाला, ‘आशा ताईंचा आवज कायम आपल्यासोबत राहील… ओम शांती…’
-
आशा भोसले यांच्या निधनावर अभिनेता सलमान खान म्हणाला, ‘प्रचंड मोठं नुकसान’
अभिनेता सलमान खान याने देखील आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आशा ताईंचा एक फोटो पोस्ट करत सलमान खान म्हणाला, ‘भारतीय संगीत विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. आशाजींच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झालं आहे. एक अतुलनीय आवाज, तुमची गाणी पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील.’
-
ईडीकडून भोंदू अशोक खरातच्या प्रॉपर्टीची सखोल पडताळणी सुरू
अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिर, नाशिक कार्यालय आणि शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. एसआयटी अधिकाऱ्यांसोबत ईडी पथकाची संयुक्त कारवाई सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रॉपर्टीची मोजणी आणि सध्याच्या बाजारमूल्याचा तपास होत आहे. प्रॉपर्टी जमा करण्यामागील उद्देश काय? याचा शोध सुरू आहे. बँक खाती सील केल्यानंतर व्यवहारांचे विश्लेषण सुरू करण्यात आले आहे.
-
आशा भोसले यांच्या निधनावर हृतिक रोशन याच्याकडून शोक व्यक्त
गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर अभिनेता हृतिक रोशन याने शोक व्यक्त केला आहे. ‘तुमच्या आत्म्याला शांती मिळो…’ असं अभिनेता दुःख व्यक्त करत म्हणाला आहे.
बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आणि दिवंगत लता मंगेशकर यांच्या बहीण आशो भोसले आज आपल्यात नाही. वयाच्या 92 व्या वर्षी आशा भोसले यांनी मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे आशा ताईंचं निधन झालं अशी माहिती डॉक्टरांनी दिली. आशा ताई यांच्या निधनानंतर संगीतविश्वातील एका पर्वाचा अंत झाला असं म्हणायला हरकत नाही. आशा ताईंनी तब्बल 12 हजार पेक्षा अधिक गाणी गायली आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी फक्त संगीताची सेवा केली… अशात त्यांच्या निधनाना सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून लोकांना आशा ताईंचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत… याबद्दल अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग….
Published On - Apr 13,2026 8:06 AM
