AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary: अटलजींच्या जयंतीदिनी नरेंद्र मोदी यांची आदरांजली, ‘सदैव अटल’ समाधी स्थळावर पुष्प अर्पण

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज 97 वीजयंती आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या स्मारकाला आदरांजली वाहिली.

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary: अटलजींच्या जयंतीदिनी नरेंद्र मोदी यांची आदरांजली, 'सदैव अटल' समाधी स्थळावर पुष्प अर्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी आदरांजली
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 25, 2021 | 12:30 PM
Share

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी  (Atal Bihari Vajpayee)यांच्या समधीस्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Prime minister Narendra Modi)यांनी आज आदरांजली वाहिली. त्यांनी ‘सदैव अटल’ या समाधीस्थळावर पुष्पांजली वाहिली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याह राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), केंद्रीय मंत्री पियूष गोयल, निर्मला सितारमण आणि हरदीप सिंह पुरी यांनीही अटल बिहारी वाजपेयी यांना पुष्पांजली अर्पण केली.

पंतप्रधान मोदींचे विशेष ट्विट

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून म्हटले की, ” आदरणी अटलजींना कोटी कोटी प्रणाम. आज जयंतीदिनी अटलजींची आठवण येतेय. त्यांची समृद्ध सेवा संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. भारताला मजबूत बनण्यासाठी तसेच देशाच्या विकासासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले. त्यांच्या विकासकामांचा भारतीयांवर सकारात्मक प्रभाव आहे.” संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर म्हटले, ‘मी अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त नमन करतो. ते एक महान देशभक्त असून एक प्रख्यात वक्ते, अद्भूत कमी, सक्षम प्रशासक आणि एक उल्लेखनीय सुधारणावादीच्या रुपात स्वतःची ओळख निर्माण केली. अटलजींचे अमूल्य योगदान विसरणे शक्य नाही. त्यांना सादर प्रणाम.’

गृहमंत्री अमित शहांचीही ट्विटरद्वारे आदरांजली

गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट केले. ते म्हणाले, ‘अटलजींनी कठोर तत्त्व आणि अद्भुत कर्तव्यनिष्ठेने देशात अंत्योदय आणि सुशासनाची कल्पना राबवून भारतीय राजकारणाला नवी दिला दिली. अटलजींनी त्यांच्या कार्यकाळात अनेक दूरदर्शी निर्णय घेऊन भारताचा पाया मजबूत केला. मोदी सरकार दरवर्षी अटलजींच्या योगदानाचे स्मरण करत उत्साहान सुशासन दिन साजरा करते. सर्वांना सुशासन दिनाच्या शुभेच्छा!’

‘राजकारणातील आदर्श युग-पुरुष’

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले, भारतीय राजकारणातील आदर्श युग पुरुष कोट्यवमधी भाजप कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक तसेच माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम. देश तसेच संघटनाच्या सेवेसाठी समर्पित, युगदृष्टे अटलजी यांचे जीवन आम्हा सर्वांसाठी एक प्रेरणास्रोत आहे.

भाजपला शिखरावर पोहोचवणारे नेते

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी झाला होता. भारतीय जनता पार्टीला यशशिखरावर पोहोचवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका पार पाडली. नव्वदीच्या दशकात ते पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून पुढे आले. केंद्रात प्रथमच भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले. पंतप्रधान पदावरील कार्यकाळात वाजपेयी यांनी देशात उदारीकरणाला प्रोत्साहन दिले. यामुळे पायाभूत सुविधा आणि विकासाला गती मिळाली.

इतर बातम्या-

Cyber crime in pune| पुणेकरांवर ‘सायबर चोरांचा’ डल्ला ; ऑनलाईन फसवणुकीच्या वर्षात १७ हजारहून अधिक तक्रारी

ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री म्हणतात, लॉकडॉऊनचा निर्णय राज्यांनी घ्यायचाय !

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!