ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री म्हणतात, लॉकडॉऊनचा निर्णय राज्यांनी घ्यायचाय!

भारती पवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ओमिक्रॉनचा संसर्ग डेल्टापेक्षा अधिक आहे. मात्र, लॉकडाऊनचा लावण्याचा निर्णय हा राज्याने घ्यायचा आहे, अशी माहिती दिली.

ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री म्हणतात, लॉकडॉऊनचा निर्णय राज्यांनी घ्यायचाय!
BHARTI PAWAR
प्रदीप कापसे

| Edited By: Yuvraj Jadhav

Dec 25, 2021 | 12:21 PM

पुणे: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. भारती पवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ओमिक्रॉनचा संसर्ग डेल्टापेक्षा अधिक आहे. मात्र, लॉकडाऊनचा लावण्याचा निर्णय हा राज्याने घ्यायचा आहे, अशी माहिती दिली. राज्यातली परिस्थिती पाहून राज्यांनी निर्णय घ्यावा, असं वक्तव्य केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केलं आहे. ओमिक्रॉन आणि कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून महाराष्ट्राला जी मदत लागेल ती मदत केंद्र सरकारकडून दिली जाईल, अशी ग्वाही देखील भारती पवार यांनी दिली.

नागरिकांनी नियम पाळावेत

केंद्राची पथकं ही राज्यात जाऊन माहिती घेतायेत आणि कळवतायेत. नागरिकांनी कोरोना आणि ओमिक्रॉन संदर्भात राज्यांनी दिलेले नियम पाळावेत, असं आवाहन केलं आहे. नियम पाळले नाहीत तर आपणचं आपला धोका ओढवून घेतोय, असं भारती पवार यांनी लॉकडाऊनसंदर्भात सूचक विधान केलं आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्र सरकारने नियमावली केलीये त्याचं पालन केलं जातंय. नागरिकांनी नियम पाळण्याचं आवाहन देखील केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केलं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी भारती पवार पुण्यात दाखल झाल्या असून भाजप खासदार गिरीश बापट यांची त्यांनी भेट घेतली.

केंद्राची पथक राज्यांमध्ये जाणार

केंद्र सरकार देखील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट झालं असून 10 राज्यात केंद्राच्यावतीनं पथक पाठवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्यासह केरळ, तामिळनाडू मध्ये केंद्राची पथक जाणार आहेत. 3 ते 5 दिवस राज्यांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती आहे. कर्नाटक, बिहार, यूपी मध्येही पथक जाणार आहे.

भारतात 415 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 415 वर पोहोचली आहे. त्यापैकी 115 जण ओमिक्रॉनच्या संसर्गातून बरे देखील झाले आहेत. महाराष्ट्रातही ओमिक्रॉन  वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 108 वर पोहोचली आहे. तर, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 42 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत. देशात 415 ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 108, दिल्लीमध्ये 79, गुजरातमध्ये 43 , तेलंगाणा 38, केरळमध्ये 37, तामिळनाडूमध्ये 34, कर्नाटक 31, राजस्थानमध्ये 22, हरयाणा 4, ओडिशा 4, आंध्र प्रदेश 4 , जम्मू काश्मीर 3, पश्चिम बंगाल 3, उत्तर प्रदेश 2, चंदीगढ 1, लडाख1, उत्तराखंडमध्ये 1 रुगणाची नोंद झाली आहे.

इतर बातम्या: 

Omicron : भारतातील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या 415 वर, महराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद

देशात फेब्रुवारीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, वेळीच सावध व्हा! कानपूर IITचा इशारा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें