देशात फेब्रुवारीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, वेळीच सावध व्हा! कानपूर IITचा इशारा

अभ्यसकांनी अमेरीका, ब्रिटन, जर्मनी आणि रुस या देशांमधील कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीवरुन काही निष्कर्ष काढले आहेत. या देशांमध्ये सध्या कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचाही दावा केला गेला आहे. दरम्यान, ब्रिटनसह ऑस्ट्रेलियातही गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णवाढीचा वेग कमालीचा वाढल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे.

देशात फेब्रुवारीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, वेळीच सावध व्हा! कानपूर IITचा इशारा
Omicron
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 9:46 PM

परदेशात कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरीएंटचा धोका वाढत असल्याची आकडेवारी समोर येत आहेत. देशासह राज्यातही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवरच आता आणखी धक्कादायक अभ्यास समोर आला आहे. या अभ्यासातून देशात फेब्रुवारीत कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

कुणी केला अभ्यास?

कानपूर आयआयटीनं (Kanpur IIT) कोरोनाच्या आकडेवारीचा अभ्यास केला आहे. कानपूर आयआयटीनं केलेल्या संशोधनात कोरोनाच्या रुग्णावाढीचा, त्याचसोबत ओमिक्रॉन वेरीएंटनं प्रभावित झालेल्या देशांचाही अभ्यास केला. या अभ्यासातून कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढेल, त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात कोरोनाती तिसरी लाट येऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

21 डिसेंबरला मेडआरएक्सआयव्हीवर करण्यात आलेल्या या अभ्यासाची अद्याप समीक्षा करण्यात आलेली नाही. कानपूर आयआयटीनं केलेल्या अभ्यासात गॉशियन मिक्श्चर मॉडेला वापर करण्यात आला होता. यावेळी अभ्यसकांनी अमेरीका, ब्रिटन, जर्मनी आणि रुस या देशांमधील कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीवरुन काही निष्कर्ष काढले आहेत. या देशांमध्ये सध्या कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचाही दावा केला गेला आहे. दरम्यान, ब्रिटनसह ऑस्ट्रेलियातही गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णवाढीचा वेग कमालीचा वाढल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे.

अभ्यासकांनी या देशांतील परिस्थिती आणि आकडेवारीचा अंदाज घेत भारतात कोरोनाची तिसरी लाट लवकरच येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. या निष्कर्षावर येण्याआधी भारतातील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील रुग्णवाढीचा आणि मृत्यदराचाही अभ्यास करण्यात आला आहे. 15 डिसेंबरपासून रुग्णवाढीचा वेग वाढत असल्याचं या अभ्यासात नोंदवण्यात आलं असून फेब्रुवारीच्या 3 तारखेपासून कोरोनाची तिसरी लाट सुरु होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शुक्रवारची आकडेवारी काय?

भारतात शुक्रवारी कोरोना व्हायरलच्या ओमिक्रॉन वेरीएंटचे 122 रुग्ण नव्यानं आढळून आले आहे. आतापर्यंत आढलेल्या ओमिक्रॉनच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद ही शुक्रवारीच करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या रुग्णांची आकडेवारी त्यामुळे 358 झाली असून महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण असल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे.

महाराष्ट्र सरकार सतर्क!

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या कोरोनाच्या संभाव्य धोक्यामुळे अनेक राज्य सतर्क झाली आहे. मध्य प्रदेशात सगळ्यात आधी नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनंही काही निर्बंध आणि नवी नियमावली जारी केली आहे. आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे.

काय आहे संपूर्ण नियमावली?

  • संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल.
  • लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल
  • इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के
  • उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल.
  • क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
  • उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील.

इतर बातम्या –

Know This: दोन्ही लसी टोचल्या खऱ्या, पण आता कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटला त्या आवर घालणार का?

Ajit Pawar | कोरोनाचा नवा विषाणू जगभरात पसरतोय, लस घ्या; अजित पवारांचं जनतेला आवाहन

Rajesh Tope | 12 वर्षांवरील मुलांना कोरोनाची व्हॅक्सिन दिली पाहिजे, असा आमचा आग्रह : राजेश टोपे

Omicron in Maharashtra : ओमिक्रॉनचा धोका, राज्यात नवी नियमावली जाहीर, काय आहेत नवे निर्बंध?

Omicron : राज्यात ओमिक्रॉनचे 20 नवे रुग्ण, नाताळ साधेपणाने साजरा करा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.