Omicron : राज्यात ओमिक्रॉनचे 20 नवे रुग्ण, नाताळ साधेपणाने साजरा करा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

राज्यात आज 20 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. दुसरीकडे नाताळ आणि नव वर्षाचं स्वागत साधेपणानं करण्याचं आवाहन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय.

Omicron : राज्यात ओमिक्रॉनचे 20 नवे रुग्ण, नाताळ साधेपणाने साजरा करा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Dec 24, 2021 | 9:17 PM

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा (Omicron) फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आज 20 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. दुसरीकडे नाताळ (Christmas) आणि नव वर्षाचं स्वागत साधेपणानं करण्याचं आवाहन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन काय?

जगाला शांती आणि प्रेमाची शिकवण देणारे प्रेषित येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव नाताळ निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आनंद आणि उत्सवाचे हे पर्व साजरे करताना जगावर आलेल्या कोरोना संकटाचे भान राखावे. विषाणूचा नवा प्रकार आणि त्याचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळावी. घरीच थांबून हा सण साजरा करावा तसेच कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

नाताळच्या पुर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, येशू ख्रिस्ताने परस्परांचा आदर आणि प्रेमभाव जपण्याची शिकवण दिली आहे. कोरोनाच्या या संकट काळात तर  या शिकवणीचे भान राखावे लागेल. जन्मोत्सव हा आनंद आणि उत्साहाचा क्षण जरूर आहे पण तो साजरा करताना आपल्याला परस्परांची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी उत्सव साजरा करण्याबाबत घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. यातूनच आपल्या आप्तस्वकीयांच्या जीवनात आरोग्य आणि पर्यायाने सुख, समृद्धी आणि समाधान येणार आहे. त्यासाठी नाताळच्या या उत्सव पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

राज्यात आज ओमिक्रॉनचे 20 नवे रुग्ण

राज्यात आज ओमिक्रॉनचे 20 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 11 रुग्ण मुंबई, 6 रुग्ण पुणे, साताऱ्यात 2 तर अहमदनगरमध्ये 1 नवा रुग्ण आढळून आला आहे. राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांचा एकूण आकडा आता 108 वर पोहोचला आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

मुंबई – 46
पिंपरी-चिंचवड – 19
पुणे ग्रामीण – 15
पुणे शहर – 7
सातारा – 5
उस्मानाबाद – 5
कल्याण-डोंबिवली – 2
बुलडाणा – 1
नागपूर – 2
लातूर – 1
वसई-विरार – 1
नवी मुंबई – 1
ठाणे – 1
मीरा-भाईंदर – 1
अहमदनगर – 1

इतर बातम्या :

Omicron in Maharashtra : ओमिक्रॉनचा धोका, राज्यात नवी नियमावली जाहीर, काय आहेत नवे निर्बंध?

चंद्रपुरातील गुन्हेगारीत वाढ झाल्यानं दारुबंदी उठवली!, अजित पवारांकडून मुनगंटीवारांना उत्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें