मोठी बातमी! राजकारण पेटलं, खासदाराच्या ताफ्यावर जमावाकडून लाठ्या-काठ्याने हल्ला, थेट…
मोठी बातमी समोर येत आहे, खासदाराचा ताफा अडून जमावाकडून वाहनावर हल्ला करण्यात आला आहे, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस देखील या हल्ल्याला रोखू शकले नाहीत, असा आरोप होत आहे, यावरून आता आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.

आंध्र प्रदेशमधून मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी पुंगनूर नगरपालिका क्षेत्रात वायएसआर काँग्रेस पार्टीचे नेते आणि राजमपेट लोकसभा मतदारसंघाचे खासदार पीव्ही मिधुन रेड्डी यांच्या ताफ्यावर जमावाकडून कथितरित्या हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला तेलुगु देसम पार्टी TDP च्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप वायएसआर पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.समोर आलेल्या माहितीनुसार खासदार पीव्ही मिधुन यांच्या ताफ्यावर मोठा हल्ला झाला आहे. ताफ्यावर दगडफेक करण्यात आली, तसेच लाठ्या -काठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवारी ही घटना घडली आहे. मिधुन रेड्डी हे अन्य काही नेत्यांसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले होते. याचवेळी हा हल्ला करण्यात आला आहे.
टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी खासदारांच्या ताफ्याला अडवलं, त्यानंतर ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले नाही पाहिजेत, यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर ताफ्यावर हल्ला करण्यात आला. गाड्यांची तोडफोड करण्यात आली. लाठ्या -काठ्याने हा हल्ला झाला, असा आरोप वायएसआर काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. जेव्हा हा हल्ला झाला, तेव्हा तिथे पोलीस देखील होते, परंतु पोलीस या हल्लेखोरांना थांबवू शकले नाहीत, असंही पक्षाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
यामध्ये निवडणूक आयोगाने लक्ष घालावं, पोलिसांना या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे तसेच या हल्लासाठी जे -जे लोक जबाबदार आहेत, त्यांना अटक करण्याचे आदेश द्यावेत. तसेच जे पोलीस कथितरित्या हा हल्ला थांबवू शकले नाहीत, त्यांच्यावर देखील या प्रकरणात कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील वायएसआर काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तसेच आमच्या उमेदवारांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान या हल्ल्यामुळे आता वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. यावरून अद्याप टीडीपीकडून कोणंतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. मात्र दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसत आहे.
