AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पाकिस्तानने युद्धविराम तोडला, जम्मूत पुन्हा ब्लॅकआऊट

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेच्या मध्यस्थिनंतर भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामाची घोषणा केली होती, मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धविराम तोडला आहे.

मोठी बातमी! पाकिस्तानने युद्धविराम तोडला, जम्मूत पुन्हा ब्लॅकआऊट
| Updated on: May 10, 2025 | 9:18 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेच्या मध्यस्थिनंतर भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामाची घोषणा केली होती, मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धविराम तोडला आहे. जम्मूमध्ये पुन्हा एकदा ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली आहे, तसेच पाकिस्तानकडून बारामुल्ला आणि राजौरी परिसरामध्ये गोळीबार करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून युद्धविरामानंतर देखील शस्त्रासंधीच उल्लंघन करण्यात आलं आहे, त्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे.

भारताकडून प्रत्युत्तर 

दरम्यान चार तासांपूर्वीच युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती, चार तासांच्या आतच पाकिस्तानकडून युद्धविराम तोडण्यात आला आहे, पाकिस्तानकडून राजौरी आणि बारामुल्ला परिसरात गोळीबार करण्यात आला, तसेच जम्मूमध्ये पुन्हा एकदा ड्रोन दिसून आल्यामुळे पूर्ण बॅकआउट करण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या या नापाक हरकतींना भारतानं देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता तणाव आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. श्रीनगरमध्ये देखील स्फोटाचे आवाज आले आहेत.

चार तासांपूर्वीच दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी अमेरिकेनं मध्यस्थी केली होती. आज पाच वाजल्यापासून युद्धविराम झाल्याची घोषणा करण्यात आली होती.  परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. आज दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओचा भारताच्या डीजीएमओला फोन आला होता, त्यानंतर युद्धविरामाची घोषणा झाली, मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत युद्धविराम तोडला आहे.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. राजौरी आणि बारामुल्ला परिसरात गोळीबार करण्यात आला, श्रीनगरमध्ये देखील स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत, तसेच जम्मूमध्ये पुन्हा एकदा ड्रोन दिसले असल्याची माहिती समोर आली आहे, जम्मूसोबतच राजस्थानमध्ये देखील दोन ठिकाणी ड्रोन दिसल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या या कारवाईला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून आता भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. युद्धविरामाच्या अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.

Follow Us
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर