अयोध्येच्या राम मंदिरात कधी आणि कशी व्हायची नोटांची चोरी? चौकशीतून मोठी माहिती समोर

Ram Mandir Theft Case : राम मंदिरातील दानचोरी प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे, दानपेटीतील नोटांची चोरी कधी व्हायची हे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अयोध्येच्या राम मंदिरात कधी आणि कशी व्हायची नोटांची चोरी? चौकशीतून मोठी माहिती समोर
ram mandir donation news
Image Credit source: Google
बापू गायकवाड | Updated on: Jul 09, 2026 | 6:56 PM

अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अशातच आता तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासात असे आढळून आले की, दानपेटीतील नोटांची चोरी मोजणीच्या वेळी नव्हे, तर त्याआधीच केली जात होती. सूत्रांच्या माहितीनुसार, दानपेटीतील नोटांची मोजणी मशीनद्वारे केली जात होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे काम दानपेटीत आलेल्या नोटा व्यवस्थित सरळ करून लावण्याचे होते. त्यानंतर SBI बँकेचे कर्मचारी त्या नोटा मोजणीच्या मशीनमध्ये टाकत असत. मात्र एसबीआयच्या कर्मचाऱ्यांकडे येण्यापूर्वीच नोटा गहाळ केल्या जायच्या.

कधी व्हायची चोरी?

मशीनद्वारे 10, 20, 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा वेगळ्या करून त्यांच्या गड्ड्या तयार केल्या जात आणि त्यानंतर त्यांची मोजणी केली जात असे. यावरून स्पष्ट होते की, नोटा व्यवस्थित लावत असतानाच त्यामधून चोरी केली जात होती. मोजणीदरम्यान नव्हे, तर त्याआधीच नोटा लंपास केल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे. अद्याप अयोध्या पोलिसांनी SBI च्या कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवलेले नाहीत. आता लवकरच ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा आणि SBI च्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे त्यातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Loading...

SBI चे माजी व्यवस्थापक गोविंद मिश्रा पोलिसांच्या रडारवर

SBI चे माजी व्यवस्थापक गोविंद मिश्रा हेही अयोध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. सध्या त्यांची नियुक्ती लखनऊ येथे आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी ट्रस्ट आणि SBI यांच्यातील सामंजस्य करारानुसार थर्ड पार्टी आउटसोर्स कर्मचारी होते. त्यांची नियुक्ती थेट ट्रस्ट किंवा बँकेने न करता, SBI ज्या खासगी कंपनीकडून कर्मचारी पुरवते त्या कंपनीमार्फत करण्यात आली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, या कर्मचाऱ्यांचे काम दानपेटीत भाविकांनी दुमडून टाकलेल्या नोटा सरळ करणे, त्यांची वर्गवारी करणे आणि गड्ड्या तयार करण्यासाठी व्यवस्थित लावणे इतकेच होते. नोटांची मोजणी सुरू असताना देखरेख करणारा सुभाष श्रीवास्तव हाही माजी बँक कर्मचारी असून त्याची नियुक्तीही एका खासगी आउटसोर्स कंपनीमार्फत करण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us