देशातला सर्वात महागडा घोडा, किंमतीत 2 BHKचे 15 फ्लॅट येतील, सुरक्षेलाच 100 बॉडीगार्ड

पुष्कर मेळाव्यात बादल नावाचा ५ कोटींचा घोडा आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. त्याचा शुभ्र रंग, मजबूत बांधा आणि शाही एन्ट्रीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. १०० बॉडीगार्डच्या सुरक्षेत येणाऱ्या या घोड्यावर लोक पैशांची उधळण करतात. बादलची आकर्षक चाल आणि नृत्यशैली पाहून सारेच थक्क झाले आहेत, त्यामुळे तो जत्रेचा सुपरस्टार बनला आहे.

देशातला सर्वात महागडा घोडा, किंमतीत 2 BHKचे 15 फ्लॅट येतील, सुरक्षेलाच 100 बॉडीगार्ड
badal horse
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2026 | 4:23 PM

दूधा सारखा सफेद रंग, मजबूत बांधा, उंच आणि आकर्षक… बादल नावाच्या घोड्याचं हे वर्णन आहे. सध्या पुष्कर मेळाव्यात बादल आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरला आहे. सोशल मीडियावर बादलच्या शाही एन्ट्रीचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. बादल जत्रेत येताच त्याला पाहायला गर्दी जमत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. त्याची चाल, कदकाठी आणि शाही अंदाज पाहून सर्वच त्याचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

व्हायरल व्हिडीओतील बादलची एन्ट्री पाहूनच या घोड्यात काही तरी खास आहे, हे दिसून येतं. बादल जत्रेत येताच तिथे असणाऱ्या लोकांची त्याचावरच नजर पडते. व्हिडीओत बादलच्या भोवती लोकांचा गराडा पडलेला दिसत आहे. त्याची एन्ट्री आता सोशल मीडियाचा विषय झाला आहे. एका रिपोर्टनुसार, बादलची किंमत 5 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. त्याला खास संरक्षण देण्यात आलं आहे. त्याच्या संरक्षणासाठी 100 बॉडीगार्ड तैनात आहेत. त्यामुळे त्याच्या एन्ट्री सोबत 100 बॉडीगार्ड येतात तेव्हा सर्वच थक्क होऊन जातात. दरम्यान, घोड्याची किंमत आणि सुरक्षेचा लवाजम्याची माहिती बादलच्या मालकानेच दिली आहे.

Loading...

15 फ्लॅट येतील…

या घोड्याची किंमत 5 कोटी आहे. या 5 कोटीत बदलापूर, टिटवाळा आणि पनवेल या भागात 30 लाखाला एक फ्लॅट या हिशोबाने 2 BHKचे 15 फ्लॅट येतील, इतका हा घोडा महागडा आहे.

एन्ट्री होताच पैशाची उधळण

बादल या जत्रेतील सुपरस्टार घोडा ठरला आहे. बादल आल्यावर त्याला पाहण्यासाठीच लोक जमा होत आहेत, असं नाही. तर जमा झालेले लोक आपसूकच खिशातून नोटा काढून बादलवर त्याची उधळण करत आहेत. लोकांचा गोंगाट, पैशांची उधळण आणि गाण्याचा दणदणाट या व्हिडीओत पाहायला मिळतो. तसेच बादलही आपल्या टापा उंचावताना दिसत आहे. जणू काही तो नृत्य करतोय असा भास होतो. सध्या तरी पुष्करच्या जत्रेत बादलशिवाय चर्चाच होताना दिसत नाहीये.

 

प्रत्येकवेळी जलवा

पुष्करच्या जत्रेत देशाच्या कानोकोपऱ्यातून अनेक लोक आपले खास घोडे घेऊन येतात. मारवाडी जातीच्या घोड्यांचं खास वेगळेपण असतं. राजस्थानमधील हे प्रसिद्ध घोडे असतात. वळलेल्या कानांमुळे हे घोडे अत्यंत वेगळे दिसतात.

 

महाराष्ट्रातून आरडीएक्स आणि अलेक्स नावाचे दोन घोडे आले आहेत. तेही मजबूत असे आहेत. या घोड्यांची किंमतही चर्चेत आहे. आरडीएक्सची उंची 68.5 आहे. तर अलेक्सची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. पण बादल पुढे सर्वच घोडे फिके आहेत. त्याचा शाही अंदाज, ढिणच्याक एन्ट्री यामुळे पुष्करच्या जत्रेतील सुपरस्टार घोडा म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us