AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IIT मुंबई येथे ‘भारत इनोव्हेट्स डीप-टेक’ पूर्व-शिखर परिषदेचे उद्घाटन; विविध मान्यवरांचा सहभाग

भारत इनोव्हेट्स डीप-टेक समिटचे उद्घाटन आज अॅस्पायर आयआयटी बॉम्बेमधील रिसर्च पार्क फाऊंडेशन येथे झाले. या कार्यक्रमाला विविध मान्यवर हजर होते.

IIT मुंबई येथे 'भारत इनोव्हेट्स डीप-टेक' पूर्व-शिखर परिषदेचे उद्घाटन; विविध मान्यवरांचा सहभाग
IIT MumbaiImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 21, 2026 | 5:42 PM
Share

मुंबई | 21 मार्च 2026: भारताच्या उदयोन्मुख डीप-टेक स्टार्टअप्सचे राष्ट्रीय प्रदर्शन असलेला भारत इनोव्हेट्स डीप-टेक समिटचे उद्घाटन आज अॅस्पायर आयआयटी बॉम्बेमधील रिसर्च पार्क फाऊंडेशन येथे झाले. भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार आणि पंतप्रधानांच्या विज्ञान, तंत्रज्ञान व नवोपक्रम सल्लागार परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर अजय कुमार सूद यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. या वेळी भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ विनीत जोशी (उच्च शिक्षण विभागाचे सचिव), प्रोफेसर अभय करंदीकर (विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव), डॉ के राधाकृष्णन (बोर्ड ऑफ गव्हर्नर्स, IIT Bombay चे अध्यक्ष) आणि प्रोफेसर शिरीष केदारे (संचालक, IIT Bombay) यांचा समावेश होता. हा दोन दिवसांचा कार्यक्रम स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, उद्योग नेते, धोरणकर्ते आणि IIT व IISc परिसंस्थेतील प्रतिनिधींना एकत्र आणतो.

हा प्री-समिट भारत इनोव्हेट्स 2026 या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचा पूर्वतयारी भाग आहे, जो यावर्षी फ्रान्स मध्ये“भारत-फ्रान्स नवोपक्रम वर्ष 2026 अंतर्गत आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमाची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी केली आहे. स्वागतपर भाषणात शिरीष केदारे यांनी IIT आणि IISc परिसंस्थेच्या सहकार्याची भूमिका अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की देशभरातून 3000 हून अधिक अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 137 उत्कृष्ट डीप-टेक स्टार्टअप्सची निवड करण्यात आली आहे.

प्रमुख पाहुणे प्रोफेसर अजय कुमार सूद यांनी उद्घाटनपर भाषणात भारताच्या तांत्रिक नेतृत्वासाठी डीप-टेक नवकल्पनांचे महत्त्व अधोरेखित केले. या सोहळ्यात डॉ विनीत जोशी, प्रोफेसर अभय करंदीकर आणि डॉ के राधाकृष्णन यांनीही भाषणे केली. राधाकृष्णन यांनी स्टार्टअप्सना संबोधित करताना म्हटले की, ‘तुम्ही भारताचा नवा इतिहास लिहिणार आहात. फ्रान्समध्ये पंतप्रधानांसोबत जाताना तुम्ही भारताचे प्रतिनिधी असाल. देशाचा अभिमान वाढवा.’

प्रोफेसर अभय करंदीकर यांनी IIT आणि IISc संस्थांची भूमिका कौतुकास्पद असल्याचे सांगितले आणि या समिटमुळे भारत जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक होईल असे नमूद केले. डॉ विनीत जोशी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजच्या शिक्षणाचा उद्देश केवळ शैक्षणिक यश नसून समाजासाठी योगदान देणे आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत उद्योग-शैक्षणिक समन्वयावर भर दिला जात आहे.

या कार्यक्रमात मनोज मीना (Atomberg Technologies चे सह-संस्थापक) आणि प्रोफेसर राहुल पुरवार (ImmunoAct चे संस्थापक) यांनी IIT मधून उभ्या राहिलेल्या डीप-टेक उद्योजकतेचे अनुभव शेअर केले. उद्घाटनानंतर मान्यवरांनी स्टार्टअप प्रदर्शनाला भेट देऊन विविध नवकल्पनांचा आढावा घेतला. या समिटमध्ये गुंतवणूकदारांसोबत संवाद, स्टार्टअप प्रदर्शन आणि पिचिंग सत्रांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी 70 हून अधिक स्टार्टअप्सनी आपले प्रकल्प सादर केले.

हे समिट भारतातील नवोपक्रम परिसंस्थेतील सर्व घटकांना एकत्र आणतो आणि जागतिक मंचावर सादरीकरणासाठी स्टार्टअप्सना तयार करतो. कार्यक्रमाचा दुसरा दिवस (22 मार्च 2026) पिचिंग सत्रे, धोरण चर्चा आणि पुरस्कार सोहळ्याने पार पडणार आहे.

भारत इनोव्हेट्स बद्दल माहिती

भारत इनोव्हेट्स 2026 हा उपक्रम भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम असून प्रधान वैज्ञानिक सल्लागारांच्या कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली राबवला जातो. याचा उद्देश भारतातील संशोधनाधारित तांत्रिक नवकल्पना जागतिक स्तरावर सादर करणे हा आहे.

IIT मुंबईबद्दल माहिती

IIT मुंबईची स्थापना 1958 मध्ये झाली असून विज्ञान व अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रणी संस्था म्हणून ओळखली जाते. 2018 मध्ये याला ‘Institution of Eminence’ दर्जा मिळाला. 2026 च्या QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत या संस्थेला भारतात दुसरे आणि जगात 129वे स्थान मिळाले आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?