AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल युजरची दिवाळी, आता रिचार्ज प्लान होणार तब्बल 50 टक्क्यांनी स्वस्त, किमती थेट एवढ्या कमी होणार…

मोठी बातमी समोर येत आहे, ट्राय लवकरच नवा नियम लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे. नव्या नियमानुसार मोबाईल रिचार्जचे प्लान तब्बल 50 टक्क्यांनी स्वस्त होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मोबाईल युजरची दिवाळी, आता रिचार्ज प्लान होणार तब्बल 50 टक्क्यांनी स्वस्त, किमती थेट एवढ्या कमी होणार...
Mobile Recharge PlanImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 11, 2026 | 6:28 PM
Share

आज काल आपल्याला प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन दिसून येतो. गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. मात्र दिवसेंदिवस मोबाईल रिचार्जचे प्लान महागत होत असल्यानं त्याची मोठी आर्थिक झळ ग्राहकांना सोसावी लागत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता ट्रायकडून एक नवा प्लान तयार करण्यात आला आहे. ट्रायच्या नव्या नियमानुसार आता ग्राहकांना स्वस्तात मोबाईलचा रिचार्ज प्लान मिळणार आहे. जे लोक डेटा प्लान वापरत नाहीत, त्यांना देखील मोबाईल रिचार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागत होते, परंतु आता असं होणार नाहीये. ट्रायच्या नव्या नियमांमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

काय आहे ट्रायचा नवा प्लान?

सध्या टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांकडून फक्त कॉल आणि एसएमएससाठी जे प्लान तयार करण्यात येतात, त्या प्लानची वैधता मर्यादीत असते, परंतु जर नवीन नियम लागू झाला तर सध्या ज्या कंपन्या 28, 56, 84 अशा दिवसांची वैधता असलेले डेटा प्लॅन देतात, त्या कंपन्यांना या कालावधीचे वैधता असलेले फक्त कॉल आणि एसएमएससाठीचे प्लॅन देखील उपलब्ध करून देणं बंधकारक असणार आहे. हे प्लान डेटा पॅकच्या तुलनेत स्वस्त असणार आहेत. जर तुम्हाला तुमच्या मोबाईल रिचार्जमध्ये टेडाची सुविधा नको असेल तर तो पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळणार आहे, आणि अनावश्यक खर्चातून देखील तुमची सुटका होणार आहे.

कोणते प्लान होणार स्वस्त?

मिडिया रिपोर्टनुसार ट्रायचं असं म्हणणं आहे की, ज्या लोकांना इंटरनेट डेटाची गरज नाही, जे लोक मोबाईलचा वापर फक्त एसएमएस आणि कॉलिंगसाठीच करतात त्यांना त्यासाठी वेगळा प्लान निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. सध्या स्थितीमध्ये जे लोक मोबाईल डेटाचा वापर करत नाहीत, मोबाईलचा वापर ते फक्त फोन आणि एसएमएससाठीच करतात त्यांना पण त्यासाठी डेटा पॅकचीच निवड करावी लागते. परंतु आता याला आळा बसणार आहे. जर ट्रायचा नवा नियम लागू झाल्यास जे लोकं फक्त मोबाईलचा वापर कॉलिंगसाठीच करतात त्यांचा मोठा फायदा होणार आहे, कारण डेटा नसलेले रिचार्ज प्लॅन या नव्या नियमामुळे तब्बल 50 टक्क्यांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसेच जो व्यक्ती एकचवेळी दोन सीम वापरतो अशा व्यक्तीला त्याचं दुसरं सीम सुरू ठेवण्यासाठी देखील या प्लॅनचा फायदा होणार आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप