AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनचा डाव चीनवरच उलटला, अमेरिकेचा मोठा धक्का, भारतालाही लागणार जॅकपॉट

गेल्या काही दिवसांपासून चीन आणि अमेरिकेमध्ये व्यापर युद्ध सुरू आहे, दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू असतानाच आता अमेरिकेनं चीनला मोठा धक्का दिला आहे.

चीनचा डाव चीनवरच उलटला, अमेरिकेचा मोठा धक्का, भारतालाही लागणार जॅकपॉट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2025 | 6:44 PM
Share

अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सोमवारी 20 ऑक्टोबर रोजी एक मोठी डील झाली आहे, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या करारावर स्वाक्षरी केली. रेअर अर्थ मिनरल्सशी संबंधित ही डील आहे. वेगवेगळे इलेक्ट्रिक वाहनांचे पार्ट बनवण्यासाठी तसेच जेटचं इंजिन आणि इतर संरक्षण क्षेत्रातील उपकरणं बनवण्यासाठी या रेअर अर्थ मिनरल्सचा उपयोग होतो.

याबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगीतलं की, आमची सलग पाच ते सहा महिने चर्चा सुरू होती, पाच ते सहा महिन्यांच्या चर्चेनंतर अखेर हा करार फायनल झाला आहे. या करारावेळी दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये व्यापर, सुरक्षा उपकरण आणि पाणबुडी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा देखील झाली आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या या कराराची एकूण किंमत  8.5 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 71,000 कोटी रुपये असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी दिली आहे. आता या करारानंतर दोन्ही देशांकडून मायनिंग आणि प्रोसेसिंग प्रकल्पात मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. सोबतच रेअर अर्थ मिनिरल्सची किंमत देखील निश्चित करण्यात आली आहे.

या डीलमुळे अमेरिकेला मोठा फायदा होणार आहे, कारण चीन अमेरिकेला आधी रेअर अर्थ मिनिरल्सचा पुरवठा करत होता, मात्र त्यानंतर अचानक चीनने ही निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला, याचा अमेरिकेला मोठा फटका बसला. कारण अमेरिका रेअर अर्थ मिनिरल्ससाठी आधी पूर्णपणे चीनवर अवलंबून होते, मात्र चीनने ही निर्यात बंद केल्यानंतर आता अमेरिकेनं ऑस्ट्रेलियासोबत नवी डील केली आहे.

भारताला होणार फायदा

दरम्यान तज्ज्ञांच्या मते या नव्या डीलमुळे भारताची बार्गेनिंग पावर देखील वाढू शकते, भारत हा रेअर अर्थ मिनिरल्ससाठी चीनवरच अवलंबून आहे. मात्र नव्या डीलमुळे अमेरिकेचं चीनवरील अवलंबित्व कमी होणार असल्यानं याचा फायदा भारताला होऊ शकतो, भारत चीनसोबत नव्यानं डील करू शकतो. या नव्या डीलमुळे आता अमेरिकेला मोठा दिलासा मिळणार आहे. ट्रम्प यांचं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. 

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...