मोठी बातमी! रशियाचा भारताला मोठा धक्का, भीषण ड्रोन हल्ल्यामध्ये औषधाचा कारखाना उडवला, अनेकजण जखमी

मोठी बातमी समोर येत आहे, रशियाच्या ड्रोन हल्ल्यामध्ये भारताचा एक मोठा फार्मा प्लांट उद्ध्वस्त झाला आहे. या हल्यामध्ये अनेकजण जखमी झाले असून, मोठं नुकसान झालं आहे.

मोठी बातमी! रशियाचा भारताला मोठा धक्का, भीषण ड्रोन हल्ल्यामध्ये औषधाचा कारखाना उडवला, अनेकजण जखमी
रशियाचा मोठा ड्रोन हल्ला
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 5:03 PM

रशिया आणि युक्रेमध्ये युद्ध सुरूच आहे. गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून हे युद्ध सुरू आहे. अमेरिकेकडून या युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना हे युद्ध थांबवण्यात अपयश आलं. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध थांबवू शकले नाहीत, तेव्हा त्यांनी रशियावर आर्थिक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेनं रशियावर आर्थिक निर्बंध घातले आहेत, एवढचं नाही तर जे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतील किंवा त्यांच्याशी व्यापारी संबंध ठेवतील त्या देशांवर आम्ही प्रचंड टॅरिफ लावू अशी उघड -उघड धमकी देखील अमेरिकेकडून देण्यात आली आहे. मात्र हे सर्व एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रशियाच्या एका ड्रोन हल्ल्यामध्ये भारताचं प्रचंड नुकसान झालं आहे.

युक्रेनमध्ये असलेला भारताचा एक मोठा फार्मा प्लांट रशियाच्या ड्रोनने उडवला आहे. हा फार्मा प्लांट भारतामधील कुसुम ग्रुपचा आहे. या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. युक्रेनच्या सुमी प्रांतामध्ये हा फार्मा प्लांट होता. या हल्ल्यामध्ये भारताचं जवळपास 400 कोटी रूपायांचं नुकसान झालं आहे. या ड्रोन हल्ल्यामध्ये इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.

Loading...

कुसुम ग्रुपची स्थापना 1994 मध्ये झाली आहे, भारतीय औषधांना युक्रेनमध्ये एक्सपोर्ट करणं हे या ग्रुपचं मु्ख्य काम आहे. सध्या भारतीय नागरिक असलेले राजीव गुप्ता या ग्रुपचे मालक आहेत. मात्र रशियाच्या हल्ल्यामध्ये युक्रेमध्ये असलेला कुसुम ग्रुपचा एक मोठा फार्मा प्लांट पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे, हल्ला होताच या परिसरात धुराचे प्रचंड मोठे लोट उठल्याचं पहायला मिळालं. या घटनेत सुमारे चारशे कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू असताना देखील हा फार्मा प्लांट युक्रेनमध्ये सुरू होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us