डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला आणखी एक मोठा धक्का, आता अमेरिका विसरा, सर्वात मोठी बातमी समोर
मोठी बातमी समोर येत आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेच्या संसदेमध्ये एक विधेयक सादर करण्यात आलं आहे, हे विधेयक मंजूर झाल्यास त्याचा मोठा फटका हा भारतीय लोकांना बसणार आहे.

अमेरिकेकडून पुन्हा एकदा भारताला धक्का देण्याची तयारी सुरू झाली आहे. यामुळे लाखो भारतीयांच्या स्वप्नावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पक्षाच्या खासदाराकडून एक बिल अमेरिकेच्या संसदेमध्ये सादर करण्यात आलं आहे. हे विधेयक संमत झाल्यास भारताला मोठा धक्का बसणार आहे. या विधेयकामुळे नोकरीच्या आधारावर मिळणाऱ्या ग्रीन कार्डच्या सध्या असलेल्या व्यवस्थेमध्ये मोठा बदल होणार आहे. जर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं तर जे भारतीय नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना मोठा धक्का बसणार आहे. ग्रीन कार्डवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अलबामाचे सिनेटर टॉमी टबरविले यांनी ‘अमेरिकन्स फर्स्ट इमिग्रेशन अॅक्ट’ नावाने हे विधेयक सादर केलं आहे.
यामध्ये नोकरीच्या आधावर देण्यात येणारी ग्रीन कार्डची सुविधा रद्द करून पॉइंट्सच्या आधावर ग्रीन कार्डची तरतूद करण्यात यावी असं या विधेयकामध्ये म्हटलं आहे. हे बिल मंजूर झाल्यास यापूर्वी ज्यांनी ग्रीन कार्डसाठी अर्ज केले आहेत, त्यांचे अर्ज देखील रद्द होण्याची शक्यता आहे. तशी तरदूतच या बिलाच्या मसुद्यामध्ये करण्यात आली आहे. हे बील मंजूर होण्यापूर्वी ज्यांचे ग्रीन कार्डसाठीचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांना मात्र ग्रीन कार्ड मिळणार आहे.
दरम्यान हे बिल मंजूर झाल्यास नोकरीसाठी अमेरिकेत जाणं हे प्रचंड कठीण होणार आहे. याचा सर्वाधिक फटका हा भारताला बसणार आहे. कारण दरवर्षी लाखो भारतीय तरुण रोजगाराच्या शोधात अमेरिकेला स्थलांतर करतात. रोजगारासाठी अमेरिकेत येणं ही फार मोठी संधी असते, आज प्रत्येकाला अमेरिकेत यायचं आहे, परंतु ही आपली जबाबदारी आहे की, इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी अमेरिकेच्या कायद्याचं आणि येथील नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे, त्यासाठीच हे नवं विधेयक सादर करण्यात आलं आहे, अशी माहिती यावेळी टॉमी टबरविले यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याची देखील धमकी दिली आहे. रशियाकडून तेल खरेदीच्या पार्श्वभूमीवर ही धमकी देण्यात आली आहे.