AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेतून मोठी गुड न्यूज, डोनाल्ड ट्रम्प यांचं भारताला सर्वात मोठं सरप्राईज

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 100 टक्के टॅरिफ लावल्यानं एका नव्या व्यापार युद्धाला सुरुवात झाली आहे, त्याचा फायदा आता भारताला होताना दिसत आहे, अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेतून मोठी गुड न्यूज, डोनाल्ड ट्रम्प यांचं भारताला सर्वात मोठं सरप्राईज
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2025 | 9:32 PM
Share

चीनने अमेरिकेच्या नाड्या आवळल्या आहेत, रेअर अर्थ मिनिरल्सची निर्यात बंद करून चायनाने अमेरिकेची मोठी कोंडी केली आहे. रेअर अर्थ मिनिरल्ससाठी अमेरिका ही पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे, याचा सर्वात मोठा फटका हा अमेरिकेला बसला असून, यामुळे अमेरिकेची उद्योग इंडस्ट्री संकटात सापडली आहे. त्यामुळे चिडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावला आहे, या टॅरिफमुळे जगात नव्या व्यापार युद्धाला सुरुवात झाली आहे. या व्यापार युद्धामध्ये आता भारताचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

चीनने रेअर अर्थ मिनिरल्सचा पुरवठा थांबवल्यानंतर आता अमेरिकेकडून पर्यायी पुरवठा साखळीचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी नुकतीच रेअर अर्थ मिनिरल्स पुरवठ्या संदर्भात जी जग विरोधात चीन अशी यादी बनवली आहे, त्यामध्ये भारताचा समावेश हा मित्र राष्ट्रांमध्ये सुचीबद्ध केला आहे. याचा फायदा हा भारताला आता अमेरिकेसोबत जी व्यापार कराराची बोलणी सुरू आहेत, त्यामध्ये होणार असल्याचं मत दिल्लीतील एका प्रमुख व्यापार-धोरण थिंक टँकने व्यक्त केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामध्ये एका मोठ्या व्यापार करारासंदर्भात बोलणी सुरू आहे, मात्र अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे या चर्चेला ब्रेक लागला होता, त्यानंतर अमेरिकेचं शिष्टमंडळ काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आल्यानं पुन्हा या करारासंदर्भात चर्चा सुरू झाली, भारत आणि अमेरिकेमधील व्यापार 2030 पर्यंत दुप्पट करणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. चीनने अमेरिकेची कोंडी केल्यामुळे आता भारत आणि अमेरिका यांच्यामधील व्यापार कराराला अधिक गती येईल असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.

तसेच डोनाल्ड ट्रम्प येत्या काळात टॅरिफबाबत देखील मोठा निर्णय घेऊ शकतात, त्यांनी सध्या भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, मात्र लवकरच या धोरणात बदल होऊन भारतावर लावलेला टॅरिफ हा 18 ते 16 टक्क्यांवर देखील आणला जाऊ शकतो, असाही अंदाज आहे. चीनसोबत अमेरिकेचे संबंध आता अधिक ताणले गेले आहेत, ज्याचा फायदा येत्या काळात भारताला होणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...